Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक तर्फी प्रेमातून तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

Webdunia
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
वर्ध्यात महाविद्यालयात शिक्षिक असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.  हिंगणघाट येथे हा प्रकार घडला असून पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकी नगराळे याला ताब्यात घेतले आहे. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून आरोपी विकी नगराळे याने सकाळी कामावर निघालेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल फेकून तिला पेटवून दिले आणि फरार झाला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीस निरिक्षक सत्यवीर भांदिवर यांनी सांगितले. 
 
या घटनेमध्ये पीडित तरुणीचा चेहरा पूर्णतः जळाला असून तिची वाचाही गेली आहे. तसेच तिच्यावर डोळे गमावण्याचीही वेळ आली आहे.  तीन महिन्यांपूर्वीही देखील नगराळेने तिला बसमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments