Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहन बोपन्नाः लॉन टेनिस ओपनच्या इतिहासातील सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम चॅम्पियन

Webdunia
रविवार, 28 जानेवारी 2024 (17:08 IST)
मेलबर्नच्या रॉड लेबर एरिनावर शनिवारी भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू अॅब्डेन यांनी केलेल्या सेलिब्रेशननंतर ते ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद मिळवल्यानंतर किती आनंदी आहेत हे दिसून आलं.
 
बोपन्नानं त्याच्या दोन दशकांपेक्षा अधिक काळाच्या दीर्घ करिअरमध्ये पहिल्यांदाच पुरुष दुहेरीचं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पण त्याचबरोबर तो ओपन एराचा सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम चॅम्पियन बनला आहे.
 
बोपन्नाच्या जोडीनं फायनलमध्ये इटालियन जोडी बोलेली आणि आंदिर्या वावसोरी यांनी 7-6(7-0), 7-5 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं.
 
बोपन्नानं हा किताब विक्रमी 43 वर्षे 329 दिवसाच्या वयात मिळवला आहे. त्यामुळं तो सर्वाधिक वय असलेला ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू बनला आहे.
 
बोपन्नाच्या या विजयात आणखी एक महत्त्वाची बाब आहे. याच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान तो जगातील नंबर-1 डबल्स टेनिसपटू बनला. त्यानं हा किताबही वर्ल्ड नंबर-1 पुरुष डबल्स टेनिसपटू म्हणून मिळवला.
 
मुलगी त्रिधाचं हसू आनंद वाढवणारं
रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू अॅब्डेन ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष डबल्सची फायनल खेळत होते त्यावेळी त्यांची मुलगी त्रिधा आई डेजी बोपन्नाच्या मांडीवर बसून त्या सामन्याचा आनंद लुटत होती.
 
बोपन्नानं विजेतेपद मिळवल्यानंतर जेव्हा कुटुंबाकडं पाहून त्यांचे आभार मानले त्यावेळी मुलगी त्रिधाचं हसू पाहून बोपन्नाच नव्हे तर मैदानात बसलेल्या सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं.
 
हा सामना पाहण्यासाठी बोपन्नाचे सासू-सासरेही आलेले होते. बोपन्नानं विजेतेपदानतंर त्यांचे आभार मानले. ते जास्त वेळा माझे सामने पाहायला का येत नाही असा प्रश्न मला पडतो. कारण 2017 मध्ये ते आले होते तेव्हा मी मिश्र दुहेरीचं विजेतेपद जिंकलं होतं आणि आज आले तर इथं जिंकलो, असंही रोहन म्हणाला.
जेव्हा करिअर संपलं असं वाटलं..
रोहन बोपन्नानं यावेळी त्याला इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल कोच स्कॉट डेवीडऑफ आणि फिजिओंचे आभार मानले.
 
ते म्हणाले, "एक वेळ अशी आली होती जेव्हा मला पाच महिने एकही सामना जिंकता आला नव्हता. मला करिअर संपलं असं वाटू लागलं होतं. पण कोचनं माझी साथ सोडली नाही. सातत्यानं माझ्याकडून कठोर परिश्रम करून घेतले आणि त्यामुळंच आज मी इथवर पोहोचू शकतो. वय वाढल्यानंतरही फिट राहण्यात फिजिओची महत्त्वाची भूमिका होती."
 
ऑस्ट्रेलियन ओपनचे आयोजक खूप काळजी घेतात त्यामुळं मी वारंवार याठिकाणी खेळायला येतो, असंही बोपन्ना यांनी म्हटलंय.
 
यूएस ओपनमधील चुकीची पुनरावृत्ती टाळली
बोपन्ना आणि अॅब्डेन जोडीनं गेल्यावर्षी यूएस ओपनमध्येही फायनलपर्यंत मजल मारली होती. पण फायनल सामन्यात दोघांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
 
यावेळी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मात्र इटालियन जोडीच्या विरोधात या दोघांनी जराही कसर सोडली नाही आणि अखेरपर्यंत विजेतेपद पटकावण्याचे प्रयत्न करत राहिलेले दिसून आलं.
 
या विजयात बोपन्नानं कधीही सर्व्हिस करताना दबाव येऊ दिला नाही. शिवाय नेटवर तर त्याची चपळतादेखील पाहण्यासारखी होती.
 
शॉट्स खेळताना मेंदूचा चांगला वापर त्यानं केल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा समोरचे टेनिसपटू डाऊन द लाइन शॉट येईल अशा अपेक्षेत असताना बोपन्नानं क्रॉस शॉट खेळत त्यांना हतबल करून टाकलं.
 
बोपन्ना मोठ्या यशाचा धनी
रोहन बोपन्नानं या ग्रँड स्लॅम स्पर्धेत 24 जानेवारीला उपांत्य सामना जिंकला तेव्हा तो टेनिस दुहेरीच्या रँकिंमधील अव्वल क्रमांक मिळवणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू बनला.
 
त्याचबरोबर बोपन्ना यावेळी पहिल्यांदाच त्याच्या दीर्घ करिअरमध्ये पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.
 
गेल्या वर्षीदेखील जेव्हा त्यानं अॅब्डेन बरोबर यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा त्यानं सर्वात वयस्कर फायनलिस्ट बनण्याचा विक्रम रचला होता.
 
गेल्या वर्षीच अॅब्डेनबरोबर इंडियन वेल्समध्ये किताब जिंकल्यानंतर तो सर्वाधिक वयामध्ये मास्टर्स 1000 किताब जिंकणारा टेनिसपटू बनला होता.
 
या सर्वामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे त्यानं कठोर परिश्रम करत स्वतःला हे करण्यासाठी कायम सज्ज ठेवलं आणि स्वतःमध्ये विजयाची भूकही कायम ठेवली.
 
रोहन बोपन्ना वर्ल्ड नंबर- 1 पुरुष दुहेरी खेळाडू बनणारा लियांडर पेस आणि महेश भूपतीनंतरचा तिसरा भारतीय टेनिसपटू आहे.
 
लियांडर पेसनं सर्वाधिक 18 ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. त्यात 8 पुरुष दुहेरीचे आहेत.
 
तर महेश भूपतीनंही डझनभर ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्यात पुरुष दुहेरीचे चार आहेत. पण भारताकडून सर्वात आधी ग्रँडस्लॅम मिळवणारा टेनिसपटू हा भूपतीच आहे.
 
आधीही आला होता बोपन्नाचा काळ
बोपन्नानं 2010 मध्ये पाकिस्तानच्या एहतिशाम उल हक कुरेशीबरोबर जोडी बनवली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
 
या जोडीचं यश पाहून ते पेस आणि भूपती यांच्या यशाची पुनरावृत्ती करू शकतात असं वाटू लागलं होतं.
 
ही जोडी त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचत असतानाच भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव आला आणि त्यामुळं त्यांना ही जोडी तोडावी लागली
 
बोपन्नानं 2021 मध्ये पुन्हा एकदा एहतिशामबरोबर जोडी बनवली. पण आधीसारखी कामगिरी करता आली नाही म्हणून ही जोडी टिकू शकली नाही.
 
2021 च्या आसपास बोपन्नाची सर्वात खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या कामगिरीत सातत्यानं घसरण होत होती. त्यामुळं एक क्षण तर असा आला होता की त्यानं निवृत्ती घेण्याचा विचारही केला होता.
 
गुडघ्याची दुखापत त्याच्या खराब कामगिरीसाठी सर्वाधिक जबाबदार होती.
 
यादरम्यान त्याला दिवसातून तीन-तीन वेळा पेनकिलर गोळ्या खाव्या लागत होत्या. पण त्यानंतरही प्रयत्न करून त्याला करिअर पुन्हा ट्रॅकवर आणण्यात यश आलं.
 
योग्य मार्गदर्शनाचा अभाव
भारतात सुरुवातीच्या काळात योग्य दिशा किंवा मार्गदर्शनाचा अभाव असल्यानं तरुणांना कोणता खेळ निवडणं त्यांच्यासाठी योग्य असेल हे लक्षातच येत नाही. रोहन बोपन्नालाही त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
 
लहानपणी त्यांना हॉकी आणि फुटबॉल खेळायला आवडत होतं. बोपन्नाचे वडील एमजी बोपन्ना कॉफीची शेती करायचे आणि मुलानं सांघिक खेळाऐवजी वैयक्तिक खेळ खेळावा अशी त्यांची इच्छा होती.
 
त्यामुळ वडिलांच्या इच्छेमुळं बोपन्नानं टेनिस खेळायला सुरुवात केली.त्यानं 2003 मध्ये एकेरीच्या स्पर्धांमधून व्यावसायिक करिअरला सुरुवात केली. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत त्यानं यामध्येच करिअर सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.
 
बोपन्नानं सिंगल्समध्ये यश मिळत नसल्यानं पेस भूपती यांच्याकडं पाहत दुहेरीचा मार्ग निवडला. पण त्यांना ग्रँडस्लॅम मिळवण्यासाठी 2017 पर्यंत वाट पाहावी लागली.
 
गेल्यावर्षी अॅब्डेनबरोबर यूएस ओपनच्या फायनलमध्ये त्याचा पराभव झाला. त्याचबरोबर बालपणीची जोडीदार सानिया मिर्झाच्या अखेरच्या सामन्यालाही अविस्मरणीय बनवण्यात त्यांना यश आलं नाही.
 
रोहन बोपन्ना 14 वर्षांचा असताना राजधानी दिल्लीत श्रीराम टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा जोडी बनवून खेळला होता. त्यामुळं गेल्यावर्षी सानियाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिच्याबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उतरले.
 
बालपणीच्या जोडीदार टेनिसपटूबरोबर ते फायनलपर्यंत पोहोचले पण विजयी कामगिरी करण्यात त्यांना यश आलं नाही.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

जयपूर अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 30 जणांची प्रकृती गंभीर

LIVE: बीड हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केले

'मुंबई आधी महाराष्ट्राची, मग भारताची' म्हणाले आदित्य ठाकरे

नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांड: वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली

गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments