Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित कसे ठेवता येते जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 31 मार्च 2021 (18:50 IST)
सध्याच्या काळात ऐकण्यात येते की अकाउंट हॅक करून एवढे पैसे काढण्यात आले. किंवा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करण्यात आले. आपण आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला हॅकर्स पासून वाचविण्यासाठी काही सोप्या टिप्सचे अनुसरण करून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक्स होण्यापासून वाचवू शकता. कसे काय चला तर मग जाणून घ्या.  
 
आजच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप काळाची गरज आहे. काही लोक या अ‍ॅपद्वारे आपला व्यवसाय देखील चालवतात, ज्यामुळे ते आपली वैयक्तिक किंवा बँक संबंधित माहिती इतर लोकांना देखील सामायिक करतात. ज्याचा गैर फायदा हे हॅकर्स घेतात आणि आपले बँकेच्या खात्यामधून पैसे काढतात. लक्षात ठेवा की कधीही आपल्या बँकेची कोणतीही माहिती व्हॉट्सअ‍ॅप मधून सामायिक करू नये. या साठी आपण आपले व्हॉट्सअ‍ॅप  सुरक्षित ठेवावे जेणे करून हॅकर्स आपल्या  व्हॉट्सअ‍ॅप चे गैरवापर आणि हॅक्स करू शकणार नाही. 
 
* टू स्टेप वेरिफिकेशन ‑हे फंक्शन दोन्ही आयओएस आणि अँड्रॉईड फोनमध्ये आहेत. हे 2 चरण सत्यापन सक्रिय करण्यासाठी, सर्वप्रथम आपण आपल्या व्हाट्सएपच्या सेटिंग्ज मेनूवर जा.
 सेटिंग > अकाउंट > 2 स्टेप वेरिफिकेशन > एनेबल निवडा. या मध्ये एक पिन द्यावे लागणार जे फक्त  व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला माहित असतो. हे कार्य केल्यावर आपल्याला  व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करण्यासाठी ते पिन प्रविष्ट करावे लागणार.   
 
* ब्लॉक कॉन्टेक्ट्स - आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला आणि त्यांनी आपल्याकडून कोणत्याही ओटीपी किंवा व्हेरिफिकेशन कोडची मागणी केली तर चुकून देखील आपण त्याला काहीही माहिती देऊ नका. त्वरितच अशा नंबरला ब्लॉक करून द्या. ब्लॉक करण्यासाठी हे करा- 
 कांटेक्ट नेम > स्क्रॉल डाउन > क्लिक ऑन ब्लॉक कांटेक्ट
 
* प्रायव्हेसी सेटिंग बदला- असं केल्याने आपली कोणतीही माहिती अशा व्यक्तीला दिसणार नाही जे आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये नाही. हे फ़ंक्शन एनेबल करण्यासाठी 
 
सेटिंग मेन्यू > क्लिक ऑन प्राइवेसी ऑप्शन > चेंज प्रोफाइल फोटो ऑप्शन टू माय कॉन्टेक्ट्स > चेंज अबाउट टू माय कॉन्टेक्ट्स > चेंज ग्रुप टू माय कॉन्टेक्ट्स > चेंज स्टेटस टू माय कॉन्टेक्ट्स करा. 
 
* लॉग आउट अवश्य करा- जर आपण आपल्या फोनच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या डिव्हाइसने व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करता तर काम झाल्यावर त्यावरून लॉगआउट करायला विसरू नका. लॉगिन असेल तर कोणीही सहजरित्या आपली माहिती मिळवू शकतो. म्हणून नेहमी लॉगआउट करा. 
 
अशा प्रकारे या गोष्टीना अवलंबवून आपण आपले व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सुरक्षित ठेऊ शकता.  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

1 कोटींची चोरी करणाऱ्या चोराला कुत्र्याने पकडले, पोलिसांचा मोठा खुलासा

मुंबईत हिट अँड रनमध्ये शिक्षिकाचा मृत्यू, 2 वर्षांची मुलगी बचावली

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

पुढील लेख
Show comments