Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय सांगता, कुत्री आणि मांजरीचे देखील विमे होऊ शकतात

Webdunia
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (09:22 IST)
सध्याच्या काळात प्राण्यांना घेऊन लोकांची संवेदनशीलता वाढली आहे. बरेच लोक त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे त्यांना सांभाळतात. उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे लोक पाळीव प्राण्यांवर बराच खर्च करत आहे. सांख्यिकी आकडेवारीनुसार 2019 मध्ये 214 लाख कुत्रे घरात पाळीव होते. तर मांजरीची संख्या 18 लाख होती. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा 'पॅट केअर मार्केट' आहे. वर्ष 2022 पर्यंत 14 टक्क्यांनी वाढून 4.90 दशलक्ष डॉलर्स (3,168 कोटी रुपये) होण्याची दाट शक्यता आहे.
 
तसं तर पाळीव प्राणी आणि जनावरांचा नेहमी विमा होत होता. पण लोक कुत्र्यांवर सुमारे 70,000-80,000 रुपये खर्च करीत आहे. या प्राण्यांसाठी विम्याची मागणी वाढली आहे.
 
* कव्हर म्हणजे काय असतं?
न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स वर्षानुवर्षे प्राणी विमा विकत आहे. आता तर नवीन कंपन्या देखील यामध्ये सामील झाल्या आहेत. व्हेटीना हेल्थकेअर ने डिझिट इंश्युरन्स सह मिळून वर्ष 2008 मध्ये पोटॅक्ट मेडिकल कव्हर सुरू केले आहे. तर बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स ने ऑगस्ट 2020 पासून कुत्र्यांसाठी विमा देण्यास सुरू केले आहे. जिथे सरकारी विमा कंपन्या पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीमध्ये सम एश्योर्ड देते तर खासगी कंपन्या मृत्यू आणि आजारपणाचे संरक्षण देतात. सूत्रांप्रमाणे लोक आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी सर्वात जास्त पॉलिसी घेतात. याचा 85 टक्के भारतीय पाळीव प्राणांच्या बाजार पेठेवर हक्क आहे. कंपनी शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन मुख्य कव्हर देते. तर येथे एकूण सह पर्यायी कव्हर आहेत.
 
* खर्च किती येणार -
बजाज आलियान्झ यांनी शस्त्रक्रियेसाठी कव्हरचा आकार 50,000 रुपये निश्चित केला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यास 10,000 रुपये असेल. त्याच्या थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हरमध्ये दोन पर्याय 5 लाख रुपये आणि 10 लाख रुपयांचे आहे. तर पॉटेक्ट चे 40,000 रुपये, 60,000 रुपये, 1 लाख रुपये आणि 1.5 लाख रुपयांचे बजाज आलियान्झ न्यू इंडिया इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स व्हेंटीना पॉटेक्ट कव्हर आहे. या मध्ये लाल, पिवळा आणि निळा रिबन कोणती ही योजना निवडता येते. प्रिमियम कुत्र्याच्या जाती,वय,आकार आणि लिंगाच्या आधारे निश्चित केले जाते.
 
* काय कव्हर होणार नाही ?
विमा सुरू होण्याच्या पूर्वी 15 -30 दिवस प्रतिक्षेची कालावधी असते. वयाची मर्यादा 8 आठवड्यांपासून ते 8 वर्षापर्यंत असू शकते. सर्व विमा कंपन्या पे -किंवा डिडक्टिबल लावते. ही पूर्वीपासून ठरविलेली मर्यादा आहे जी कंपनी आकारते. बजाज आलियान्झच्या बाबतीत ते शल्यक्रिया आणि रुग्णालयात दाखल करण्याचा 10 टक्के आणि ओरिएण्टल आणि न्यू इंडिया इंश्युरन्सच्या बाबतीत सम एश्योर्डचा 20 टक्के आहे. कंपन्या पूर्वी पासूनच आजारांना संरक्षित करीत नाही.
 
* हे कव्हर खरेदी करावे का ?
या प्रश्नाचे उत्तर जाणकार होय म्हणून देतात. कारण या काळात लोक आपल्या पाळीव प्राण्यांवर बरेच खर्च करतात. हे बघता कव्हर घेणं योग्य ठरेल. पाळीव प्राण्यांचे उपचार देखील झपाट्यानं वाढत आहे. शस्त्रक्रिया वर सरासरी 20,000-30,000 रुपये खर्च होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments