Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दररोज सकाळी बसल्या बसल्या 10 मिनिटांत करा ही योगासने, फायदेशीर आहे

Webdunia
गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (21:50 IST)
निरोगी राहण्यासाठी योग करणे खूप चांगले आहे. दररोजच्या धकाधकी च्या जीवनात योग करायचा आहे पण सकाळी वेळे अभावी योग क्लासेस मध्ये सामील होऊ शकत नाही? निरोगी रहायचे आहे परंतु व्यायामासाठी वेळ नाही? जर आपल्याला ही वेळे अभावामुळे हे शक्य नाही तर 10 मिनिटाचा वेळ काढून आपण ही काही आसने घरी बसल्या करू शकता. हे आसन करायला खूप सोपे आहे. हे केल्याने आपण दिवसभर उर्जावान राहाल. चला तर मग कोणती आसने आहे , आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊ या. 
 
1 सेल्फ ह्ग पोझ -सेल्फ हग पोजसाठी दोन्ही हात पसरून बसावे लागेल. एखाद्याला मिठी मारल्यासारखे हात पसरावेत. मान मागे खेचा. आणि स्वतःला मिठी मारा.
 
फायदे -ही मुद्रा तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवते. आपल्याला जे आवडतात आपण  त्यांनाच मिठी मारतो. या आसनामुळे स्वत:ची स्टीम वाढते
 
 
2 कटी चक्रासन
हे आसन बसून करायचे आहे . या साठी कंबर ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि शक्य तितक्या उजवीकडे वळा. थोडा वेळ श्वास रोखून धरा. जर प्रथमच ही   योगासने शिकत असाल तर श्वासही घेऊ शकता. त्यानंतर समोर येऊन श्वास सोडा. आता एकदा सामान्य श्वास घ्या. नंतर डाव्या बाजूला समान प्रक्रिया पुन्हा करा.
 
फायदा-पोटाची आणि कंबरेची चरबी कमी करते उभे राहून हे आसन केल्याने इतरही फायदे मिळतात.
 
3 ताडासन
 पाठ सरळ करून बसा. यानंतर बोटे एकमेकांत अडकवून बसा. आतून श्वास घ्या आणि तळहाता समोर ठेवून हात पसरवा. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर  हात वर घेऊ शकता. हात वर करताना, दीर्घ श्वास आत घ्या. खाली येताना श्वास सोडा.
 
फायदा-बसून हे आसन केल्याने  शरीराचा वरचा भाग लवचिक होतो. हे आसन करताना  मान इकडे-तिकडे हलवा .या मुळे  खांदे आणि पाठदुखीपासून आराम मिळेल.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

Corn Chaat: रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चाट घरी सहज बनवा,रेसिपी जाणून घ्या

टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच फेस क्रीम बनवा

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यात कच्च्या कांद्या खाण्याचे फायदे जाणून घ्या

कंबरेला आकार देण्यासाठी ही योगासने करा

पुढील लेख
Show comments