Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोळ्यांत वेदना आणि जळजळ होत असेल तर या योगासनांचा सराव करा

डोळ्यांत वेदना आणि जळजळ होत असेल तर या योगासनांचा सराव करा
Webdunia
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (21:30 IST)
डोळे हे आपल्या शरीराचा सर्वात नाजुक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.  जास्त वेळ स्क्रीनवर काम केल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते. डोळ्यात कोरडेपणा जाणवतो.रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि पुरेशी झोप न मिळाल्याने डोळ्यांत वेदना आणि जळजळ होणे ही सामान्य गोष्ट आहे.
ALSO READ: जर तुम्ही योगासनांच्या या ५ टिप्स फॉलो केल्या तर व्यायामाशिवायही तुम्ही निरोगी राहाल
डोळ्यांच्या या समस्या टाळण्यासाठी डोळ्यांना भरपूर विश्रांति द्या, पुरेशी झोप घ्या. धुर, धूळ आणि प्रदूषणापासून दूर रहा. बॅक्टेरियाचा संसर्ग झाला असेल तर त्वरित डॉक्टरांना भेट द्या. डोळ्यांचे आरोग्य सुधरण्यासाठी योगासन करण्याची सवय लावा. नियमित योगसनानांचा सराव केल्यावर डोळे दुखी, जळजळीपासून आराम मिळतो. शिवाय डोळ्यांची दृष्टि सुधारते. चला या योगसना बद्दल जाणून घेऊ या.
ALSO READ: दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल
डोळे वर खाली फिरवणे
डोळ्यांना वर खाली आणि सर्व दिशेने फिरवा. हा एक चांगला व्यायाम आहे. भुवयांच्या मध्ये पाहताना नाकाच्या टोकाला पाहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा ही क्रिया करा. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. डोळ्यातील वेदना आणि जळजळ कमी होते. तसेच अंधुक दृष्टीच्या त्रासापासून देखील आराम मिळतो.
 
डोळ्यांची मालिश करणे
भुवयांची मालिश केल्याने डोळ्यांची मालिश देखील होते. डोळ्यांची मसाज करण्यासाठी बोटांनी डोळ्याखाली मसाज करा. नंतर अंगठ्याने पापण्यांना हळुवार मसाज करा. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.
ALSO READ: हे 5 सोपे व्यायाम जास्त वेळ उभे राहिल्याने होणारा थकवा दूर करतील
चक्रासन -
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी चक्रासनाचा सराव करा. या मुळे डोळ्यातील वेदना आणि जळजळ पासून आराम मिळतो. आणि डोळ्यांची दृष्टि सुधारते. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

Beauty Tips ,White Hair Treatment ,चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या

खजूराच्या बिया शरीराला देतात हे 5 जादुई फायदे,जाणून घ्या

प्राथमिक शिक्षक म्हणून करिअर करा

पुढील लेख