Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Yoga for Hair Fall: केसांची गळती थांबवतात ही 4 योगासन

Webdunia
रविवार, 24 जुलै 2022 (13:56 IST)
केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यामुळे केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील त्रस्त आहेत. विशेषत: आजचे धकाधकीचे जीवन आणि त्यातून निर्माण होणारा ताण यामुळे ही समस्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत योग्य आहार, उपचार आणि केसांची देखभाल खूप महत्त्वाची ठरते.आजच्या काळात बहुतेक महिला आणि पुरुषांना केस गळण्याची समस्या भेडसावत आहे. हे टाळण्यासाठी, लोक सहसा उत्पादनांमध्ये हजारो रुपये खर्च करतात. अशी काही साधी योगासने आहेत जी केसगळती रोखून केस मजबूत आणि निरोगी बनविण्यास मदत करतात.चला तर मग जाणून घेऊ या 
 
1 कपालभाती-
* वज्रासन किंवा पद्मासनाच्या स्थितीत जमिनीवर बसा.
* हाताची पहिली बोट आणि अंगठा जोडून मुद्रा करा.
* तळहाताचा भाग वरच्या बाजूला ठेवून हात गुडघ्यावर ठेवा.
* एक दीर्घ श्वास आत घ्या आणि जोरात बाहेर सोडा. यानंतर,  श्वास आत घेत राहा.
* श्वास नाकाने घ्यावा.
 
2 अनुलोम विलोम-
* मांडी घालून जमिनीवर बसा.
* उजव्या हाताच्या अंगठ्याने नाकाची उजवी बाजू दाबा आणि नाकाच्या डाव्या बाजूने श्वास घ्या.
* अनामिक बोटाने डावा भाग दाबा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा.
* या संपूर्ण क्रियेची पुनरावृत्ती करा, डाव्या आणि उजव्या बाजूंमध्ये बदल करा.
 
3 सर्वांगासन-
* सर्वपथम पाठीवर झोपा आणि दोन्ही हात मांड्याजवळ ठेवा.
* आपले पाय हळू हळू वर करा आणि 90 अंश कोनात आणा.
* कोपरे जमिनीवर ठेवून, कमरेला हाताने आधार द्या आणि हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने आणायला सुरुवात करा.
* पाय डोक्याच्या दिशेने आणा, पायाची बोटे जमिनीवर ठेवा. कंबरेवरून हात काढून सरळ जमिनीवर ठेवा.
* थोडा वेळ अशा स्थितीत राहा आणि नंतर हळू हळू झोपलेल्या स्थितीत परत या.
 
4 शीर्षासन कसे करावे  -
* वज्रासनाच्या स्थितीत बसा आणि हात पुढे करत असताना कोपरे  जमिनीवर ठेवा.
* दोन्ही हातांची बोटे घट्ट जोडून ,डोक्याच्या मध्यभागी घेऊन खाली टेकवून घ्या.
* पायाच्या बोटांच्या मदतीने खालचा भाग वर आणा, यामुळे शरीर त्रिकोणाच्या आकारात येईल.
* कोपऱ्यांना  जमिनीवर घट्ट टेकवून ठेवा आणि हळूहळू पाय वर करा.
*,दोन्ही पाय एकत्र उचलण्याऐवजी, तुम्ही त्यांना एक-एक करून उचलू शकता.
* काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर पाय हळूहळू खाली आणा. संपूर्ण आसन पुन्हा करा.
 
 
 
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments