मेष-शारीरिक जडण-घडण
आपल्या राशीच्या लोकांचे शरीर मजबूत व बांधा प्रभावशाली असतो. जो आपल्या व्यक्तीमत्वाला शोभा देतो. मध्यम ऊंची व चांगले आरोग्य यामुळे आपण इतरांवर सखोल प्रभाव पाडता. आपल्या हाताच्या बोटांपेक्षा आपल्या हाताचे तळवे मोठे असतात. कपाळही मोठे असते. आपल्या डोक्यावर किंवा कपाळावर कोणत्याही भागावर जखमेची खुण राहेल. तर चेहर्‍यावर तिळ असेल. या लोकांच्या भुवया नेहमी वरती असतात. ते नेहमी चौकस असतात. त्यांचे डोळे अशक्त असतात. या राशिचा प्रभाव कपाळावर असतो त्यामुळे या लोकांना मानसिक शांति मिळत नाही. या लोकांमध्ये उष्णता अधिक असते.

राशि फलादेश