Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना व्हायरस : ब्रिटिश एअरवेज 36 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करणार

Corona Virus
Webdunia
गुरूवार, 2 एप्रिल 2020 (13:39 IST)
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ब्रिटीश एअरवेजचं काम तात्पुरतं बंद आहे. कर्मचाऱ्यांबाबत ब्रिटीश एअरलाईन आणि युनाईट युनियन यांच्यात गेल्या आठवड्याभरापासून वाटाघाटी सुरू आहेत.
 
ब्रिटिश एअरवेज आणि युनाईट युनियन यांच्यात करार करण्यात येणार असून काही बाबींवर चर्चा सुरु आहे.
 
करारानुसार ब्रिटिश एअरवेज आपल्या केबीन क्रू, इंजिनिअर्स आणि मुख्य कार्यालयातील कर्मचारी अशा जवळपास 80 टक्के कर्मचाऱ्यांचे निलंबन करणार आहे.
 
या निर्णयाचा फटका गॅटवीक आणि लंडन शहर विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन्ही विमानतळावरील यंत्रणा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
 
कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देण्यात यावं यासाठी युनायटेड युनियन आग्रही असल्याचं समजतंय. तर ब्रिटिश एअरवेजने पायलट्ससोबत वेगळा करार केला असून त्यानुसार पुढील दोन महिन्यांसाठी सर्व पायलटच्या वेतनात ५० टक्के कपात केली जाणार आहे.
 
ब्रिटिश एअरवेज ही इंटरनॅशनल एअरलाईन्स ग्रुप (IAG) या मुख्य संस्थेअंतर्गत काम करते. IAG ची आर्थिक परिस्थिती ही त्यांच्या स्पर्धकांपेक्षा चांगली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने मोठा नफा कमावला आहे.
 
पण तरीही एअरलाईनकडून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं जात आहे. यावरूनच यूकेतील हवाई वाहतुकीवर बंधनं आल्याने किती मोठं आर्थिक नुकसान होत आहे हे लक्षात येतं.
 
पुढील काही महिन्यांच्या सर्व बुकींग्ज रद्द करण्यात आल्या असून यामुळे आर्थिक फटका बसतोय.
 
पुढच्या तीन महिन्यांत कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचं आर्थिक नुकसान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फ्लाईट्स बुकींग रद्द झाल्याने हजारो कोटी पाऊंडचं नुकसान हे केवळ तिकीटाचे रिफंड द्यावं लागल्यामुळे होणार आहे.
 
व्हर्जिन अटलांटीकने कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी नोकरीवरून निलंबित केलं आहे. तर इजीजेट या कंपनीतल्या कर्मचारी वर्गाला तीन महिने नोकरीवर रूजू होता येणार नाही.
 
या आठवड्यात ब्रिटिश एअरवेजकडून पेरूमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी काही फ्लाईट्स सुरू करण्यात येणार आहेत.
 
यूकेतील काही एअरलाईन्सकडून या फ्लाईट्सचं नियोजन केले जात आहे. हजारो ब्रिटिश नागरिक आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अडकले असून त्यांना मायदेशी आणण्यासाठी येत्या आठवड्यात काही फ्लाईट्स सुरू करण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

पुढील लेख
Show comments