rashifal-2026

पॅकेज बुक करताना हे प्रश्न आवर्जून विचारा

Webdunia
गुरूवार, 21 जानेवारी 2021 (14:52 IST)
जर आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्रोगाम बनवताना ट्रेवल एजेंसी बुकिंग करण्याची योजना आखत असाल तर आपल्याला काही प्रश्न असे आहे जे आधीच स्पष्ट केले पाहिजे ज्याने आपल्या टूरमध्ये कुठल्याही प्रकाराचे ताण, वाद, अतिरिक्त आर्थिक खर्च किंवा मूड खराब होण्याची स्थिती निर्माण होण्यापासून वाचता येईल.
 
पॅकेजमध्ये काय काय सामील आहे?
अनेकदा याबद्दल माहिती पूर्णपणे दिलेले नसते. अशात स्पष्ट विचारावे की यात रस्त्यात लागणारे वाहन, टॅक्स, ड्रायव्हरचा खर्च, खाण्या-पिण्याची, पर्यटन स्थळाचे तिकिट इतर व्यवस्था सामील आहे वा नाही. 
 
मुलांसाठी विशेष सुविधा आहे का?
आपण भ्रमण करत असलेल्या ठिकाणी मुलांच्या हिशोबाने व्यवस्था आहे का, जसे मनोरंजन पार्क, फूड, आणि इतर...
 
पिकअप आणि ड्रॉप पॉइंट कोणते आहे?
आपल्याला सोयीस्कर पडेल असे पिकअप आणि ड्रॉप पॉइंट निवडावे. तसेच आपल्या हॉटेलहून दर्शनीय स्थळापर्यंत जाण्यासाठी वाहनांची सुविधा आहे की नाही ज्याने वेळेवर कोणताही गोंधळ होऊ नये.
 
सु‍रक्षा व्यवस्था
ट्रेवल करताना रस्ता कितपत सुरक्षित आहे तसेच ट्रेवल एंजसीकडून नियुक्त माणूस विश्वासू असल्याचे सुनिश्चित करावे. 
 
हवामान कसा असेल?
कोणतेही स्थळ निवडताना तिथले वातावरण कसे असेल हे निश्चित करावे. अनेकदा खराब हवामानामुळेे पर्यटनाचा मजा खराब होतो. अती उन्हाळा, पाऊस किंवा थंडीमुळं अडथळे निर्माण होतात.
 
आहाराची व्यवस्था कशी आहे?
आपल्या आवडीप्रमाणे आहारात पदार्थ सामील आहे की नाही हे स्पष्ट करावे. अनेकदा दुसर्‍या प्रदेशातील आहार प्रत्येकाला पचवणे अवघड जातं. अशात सकाळच्या चहापासून रात्रीच्या भोजनापर्यंत काय-काय सामील आहे जाणून घ्यावे. 
 
डॉक्युमेंट्स
प्रवासासाठी कुठलेही दस्तऐवज हवे ते जाणून घेणे योग्य ठरेल. कारण अनेकदा काही एडवेंचर, किंवा एखाद्या विशेष स्थळी जाण्यासाठी विशेष कागदपत्रांची गरज भासते. अशात आपल्याजवळ ते ओळखपत्र, फोटो, बँक स्टेटमेंट इतर डॉक्युमेंट्स सोबत असणे गरजेचं असतं.
 
आरोग्य सुविधा काय?
रस्त्यात तब्येत खराब झाल्यास डॉक्टरांची व्यवस्था तसेच सोबत फस्ट एडमध्ये काय- काय उपलब्ध होऊ शकेल हे जाणून घ्यावे.
 
पॅकेज रद्द करायचे असल्यास?
काही कामामुळे आपलं जाणं निरस्त होत असल्यास पॅकेज रद्द केल्यावर किती टक्के पैसे कापले जातील हे देखील माहीत करून घ्यावे.
 
हे सर्व मेलद्वारे माहिती केल्यास अर्थात आपल्याकडे लिखित रेकॉर्ड असल्यास अजूनच योग्य ठरेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

नायक म्हणून मर्यादित यशानंतर, नील नितीन मुकेशने खलनायक भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले

प्राचीन वास्तुकलेसह एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ हंपी, कर्नाटक

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

पुढील लेख
Show comments