Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रभास केवळ पैन-इंडिया स्टार नाही, तर एक ग्लोबल स्टार आहे, हा घ्या पुरावा!

Webdunia
शुक्रवार, 12 जून 2020 (21:19 IST)
सुपरस्टार प्रभास त्या अभिनेत्यांपैकी आहेत जे आपली मेहनत आणि समर्पणाने प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओततात. या सुपरस्टारचे फैनबेस सगळीकडे पसरले आहे ज्याला सीमा नाही. आणि हेच कारण आहे की प्रभासची लोकप्रियता आता पैन-इंडिया पासून पैन-वर्ल्ड झाली आहे आणि ज्याचे श्रेय त्या दमदार प्रोजेक्ट्सना जाते ज्यासोबत अभिनेता दर्शकांचे मनोरंजन करत आला आहे.
 
दो भागाचे महाकाव्य असलेला बाहुबली चित्रपट 2016 मध्ये भारतात प्रदर्शित झाला आणि त्यानंतर सीमा ओलांडून जापान, चीन, इंडोनेशिया, लंडन आणि नुकत्याच रशियन टेलीविजनवर देखील प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाला जवळपास जगातल्या प्रत्येक भागात दर्शकांचे प्रेम लाभले. यासोबतच, प्रभासचा आणखी एक चित्रपट साहो ला जानेवारीत जापानमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते ज्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. आपण गाजावाजा न करता शांतपणे कठोर मेहनत करावी आणि चित्रपटांच्या यशातून बोलावे यावर प्रभास विश्वास ठेवतो.
 
प्रभास नेहमीच दिग्दर्शकांचा आवडता राहिला आहे कारण त्याने नेहमीच आपल्या चित्रपटांमधून दमदार परफॉर्मेंस दिला आहे आणि त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशासोबत आपली एक वेगळी ओळख बनवण्यात यशस्वी झाला आहे. तो नेहमीच स्वत:साठी एक बेंचमार्क स्थापित करत आला आहे आणि त्याची स्वत:शीच स्पर्धा राहिलेली आहे. अभिनेता एक प्रेमी ते एक बागी आणि इतरही अनेक व्यक्तिरेखा लीलया पेलवणे उत्तमरीतीने जाणतो. निश्चितच, प्रभासच्या समर्पण आणि कठोर मेहनतीने त्याला पैन-वर्ल्ड स्टार बनवले आहे ज्याला सीमांचे बंधन नाही.
 
त्याच्या व्यक्तिरेखांची लोकप्रियता पाहताना, नुकताच प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वार्नरने देखील आपल्या मुलीसोबत प्रसिद्ध बाहुबली डायलॉगवर एक वीडियो रीक्रिएट केला आहे. या व्हिडिओला प्रचंड लाईक करण्यात आले आहे ज्याला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साहाला सीमाच राहिली नाही. या सगळ्यावरून हेच दिसते की कित्येक वर्षांनी देखील हा चित्रपट दर्शकांच्या मनात अजूनही ताजाच आहे.
 
प्रभास सध्या आपल्या 20व्या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेतो आहे आणि दिग्दर्शक नाग-अश्विनसोबतचा हा त्याचा आगामी चित्रपट पहिल्यांदाच पैन-वर्ल्ड प्रदर्शित होणार आहे.    

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments