Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी दिसणार सिनेमाघरांमध्ये 'पुष्पा 2'

Webdunia
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (13:25 IST)
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 बाबत मोठी बातमी समोर आली असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार साऊथचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा 1: द राइज' या चित्रपटाचा दुसरा भाग असून 2024 मध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा 2 दुसऱ्या भागाची रिलीज डेट पुन्हा पुन्हा बदलली जात आहे. यापूर्वी, ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पुष्पा 2 प्रदर्शित होणार होता, पण चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण होऊ शकले नाही त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. 
 
तसेच यानंतर निर्मात्यांनी निर्णय घेतला की हा चित्रपट 6 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होईल. आता पुन्हा एकदा 'पुष्पा 2'ची रिलीज डेट बदलली आहे. 'पुष्पा 2' च्या रिलीजबाबत, अल्लू अर्जुनने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'पुष्पा 2' चे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की 'पुष्पा 2' आता 6 डिसेंबरला नाही तर एक दिवस आधी 5डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे.  
 
तसेच अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना असणार आहे. तसेच, पहिल्या भागात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने एक आयटम साँग केले होते, पण आता बातमी येत आहे की, समंथाच्या जागी श्रद्धा कपूर हे गाणे करणार आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंडली भाग्यची अभिनेत्री श्रद्धा आर्या बनली जुळ्या मुलांची आई

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

सर्व पहा

नवीन

सुनील पाल झाले अचानक बेपत्ता, 24 तासात सापडला कॉमेडियन

मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी

कुंडली भाग्यची अभिनेत्री श्रद्धा आर्या बनली जुळ्या मुलांची आई

एक सुंदर स्मारक लाल किल्ला दिल्ली

मुंबईच्या नाटकाचं उद्घाटन सानंद इंदूरच्या रंगमंचावर

पुढील लेख
Show comments