Festival Posters

‘लालसिंग चड्ढा’ मधील करीनाचा लूक प्रदर्शित

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (09:51 IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘लालसिंग चड्ढा’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर-खान स्क्रीन शेअर करत आहे. व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत करीनाचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट २०२० मध्ये नाताळला प्रदर्शित होणार आहे. 
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर करीनाचा फर्स्ट लूक शेअर करत ही माहिती दिली. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये करीना पंजाबी मुलीच्या रुपात दिसत असून तिने आमिरला मिठी मारली आहे. परंतु यात आमिर पाठमोरा उभा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने करीना बऱ्याच वर्षांनंतर पंजाबी मुलीची भूमिका साकारत असल्याचं दिसून येत आहे.
 
 दरम्यान,१९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments