Marathi Biodata Maker

पूजाने वाढवले मानधन

Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (12:36 IST)
पूजा हेगडे लवकरच प्रभासबरोबर ‘राधे शाम'मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजयबरोबर ती एका सिनेमातही असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.
 
या सिनेमाचे शीर्षकदेखील अद्यापनिश्चित झालेले नाही. हा सिनेमा थलपती विजयचा 65 वा सिनेमा असणार आहे. म्हणून सध्या तरी या सिनेमाला विजय 65 म्हणूनच संबोधले जात आहे. प्रभासबरोबर काम केल्यामुळे आता पूजाची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढली आहे. तिने आपल्या मानधनामध्ये वाढ केली आहे. आता ती एका सिनेमासाठी 2.5 कोटी रुपये मानधन घेणार आहे. प्रभासबरोबरचा ‘राधे शाम' हा पूजा हेगडेचा दक्षिणात्य सिनेमातील 8 वर्षांनंतर पुनरागमन करणारा सिनेमा आहे.
 
पूजाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातच दक्षिणात्य सिनेमांमधूनच केली होती. हिंदीमध्ये जम बसवण्यापूर्वी दीर्घकाळ ती दक्षिणेतच सक्रिय होती. यापूर्वी अल्लू अर्जुन बरोबर ‘वैकुंठपुरमलो'मध्ये पूजाने काम केले होते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिच्या वाट्याला ‘राधे शाम' आणि ‘सर्कस'ची ऑफर आली. आता वाढीव मानधनाच्या आधारे ती दक्षिणेबरोबरच हिंदीमध्येही जबरदस्त परफॉमन्स देण्याची तयारी करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे अडचणीत

धुरंधरने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला: चौथ्या आठवड्यात 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला हिंदी चित्रपट बनला

New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

विल स्मिथवर लैंगिक छळाचा खटला; टूर व्हायोलिन वादकाने केले गंभीर आरोप

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

पुढील लेख
Show comments