Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोनाचे १८,०५६ नवे रुग्ण सापडले

Webdunia
सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (08:34 IST)
राज्यात रविवारी कोरोनाचे १८,०५६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३८० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६६% एवढा आहे. 
 
रविवारी १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. या आकड्यानुसार राज्यात आतापर्यंत एकूण १०,३०,०१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१% एवढे झाले आहे. 
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ९२,५३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,५६,४०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ४९,४१,६२८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ९४,५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments