Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 67,608 सक्रिय रुग्ण; 8,333 नव्या रुग्णांची वाढ

Webdunia
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (08:14 IST)
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आठ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या राज्यात 67 हजार 608 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 38 हजार 154 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 17 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 4 हजार 936 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
दिवसभरात राज्यात 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 52 हजार 041 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.43 टक्के एवढा आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 3 लाख 18 हजार 707 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 688 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
पुण्यात सध्या सर्वाधिक 12 हजार 577 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 9 हजार 141 सक्रिय रुग्ण आहेत. अमरावती 6 हजार 740, मुंबईत 7 हजार 899, ठाण्यात 7 हजार 276 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजप जो काही निर्णय घेईल शिवसेना त्याला पाठिंबा देईल-एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी बोलावली पत्रकार परिषद, कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री?

निवडणूक निकालाबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, कार्यकर्त्यांना दिल्या या सूचना

मुंबईत भरधाव कार दुभाजकाला धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

PKL 2024: तमिळ थलायवासने यूपी योद्धास 14 गुणांनी पराभूत केले

पुढील लेख
Show comments