Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुगल सर्चवर करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा नवा पर्याय

Webdunia
बुधवार, 17 जून 2020 (19:50 IST)
आता गुगलने जवळच्या करोना चाचणीचे केंद्र झपटप शोधून देणारा एक नवा पर्याय गुगल सर्चवर उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
 
“जवळचे अधिकृत कोविड १९ चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि सात प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त गुगल करा,” अशा कॅफ्शनसहीत @PIBMumbai या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये गुगलच्या मदतीने कशापद्धतीने जवळचं करोना चाचणी केंद्र शोधता येईल यासंदर्भातील माहिती तीन मुद्द्यांसहीत देण्यात आली आहे.
 
कसे शोधाल जवळचं करोना चाचणी केंद्र?
 
१) गुगलवर ‘Coronavirus Testing’ किंवा ‘COVID Testing’ या टर्म सर्च करा.
 
२) हा सर्च रिझल्ट दाखवताना तुम्हाला टेस्टींग नावाचा एक टॅब दिसेल. यामध्ये तुमच्या जवळच्या करोना चाचणी केंद्रांची माहिती आणि इतर महत्वाच्या टीप्स दिलेल्या असतील.
 
३) या केंद्रांना भेट देण्याआधी भारत सरकराने सुरु केलेल्या 1075 या हेल्प लाइन क्रमांकावर कॉल करा आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन जवळ घेऊन जा.
 
४) ही सेवा इंग्रजी, हिंदीबरोबरच सात भारतीय प्रदेशिक भाषांमध्ये आहे. यात मराठी, बंगाली, तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड आणि गुजराती भाषेचा समावेश आहे.
 
जवळचे अधिकृत #COVID19 चाचणी केंद्र शोधण्याची सर्वात सोपी पद्धत पुढीलप्रमाणे. शोधा इंग्रजी, हिंदी आणि 7 प्रादेशिक भाषांमध्ये. फक्त #Google करा.
 
जाण्यापूर्वी 1⃣0⃣7⃣5⃣ वर कॉल करा व डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन पेपर घ्या.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments