Dharma Sangrah

नाशिकमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ७१ ने घट

Webdunia
शनिवार, 24 एप्रिल 2021 (22:16 IST)
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत  प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४६ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ७१ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार २२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. 
 
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ८४६, चांदवड १ हजार ६८०, सिन्नर १ हजार ७१५, दिंडोरी १ हजार ५५३, निफाड ३ हजार ३३६, देवळा १ हजार १३, नांदगांव ८९६, येवला ७०४, त्र्यंबकेश्वर ५०७, सुरगाणा ३७१, पेठ १९४, कळवण ७६३, बागलाण १ हजार ५४४, इगतपुरी ४९४, मालेगांव ग्रामीण ७६८ असे एकूण १७ हजार ३८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७ हजार ६५६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६४६ तर जिल्ह्याबाहेरील १८० असे एकूण ४६ हजार ८६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ९२ हजार ४०१ रुग्ण आढळून आले आहेत.
 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८३.४८ टक्के, नाशिक शहरात ८१.४२ टक्के, मालेगाव मध्ये ८२.८० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.८७ इतके आहे.
नाशिक ग्रामीण १ हजार ४४२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ४५४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २३५ व जिल्हा बाहेरील ९५ अशा एकूण ३ हजार २२६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
२ लाख ९२ हजार ४०१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ४२ हजार ३०९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४६ हजार ८६६ पॉझिटिव्ह रुग्ण.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण८२.८७ टक्के.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

'SIR 2' साठी भाजप महाराष्ट्राने केली विशेष तयारी, प्रतिनिधींची यादी जाहीर

मुंबई: धारावी येथे छाप्यात लाखो रुपयांची औषधे जप्त

LIVE: एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय हनुमंत जगदाळे यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती

नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत होता

रेल्वेने मुंबई ते प्रयागराज दरम्यान ४४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला

पुढील लेख
Show comments