Dharma Sangrah

रेल्वे प्रवाशांना मिळणार तिकिटाचा शंभर टक्के परतावा : लॉकडाउन वाढल्याने रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (13:52 IST)
राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन 14 एप्रिल नंतर टप्पटप्प्याने रेल्वे सुरू होईल या आशेने रेल्वे मंत्रालयाने ठरावीक मार्गावरील प्रवाशांची ऑनलाइन बुकिंग घेतले अनेक प्रवाशांनी टिकीट बुकिंग केले. मात्र, आता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढल्याने बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना तिकिटाचा शंभर टक्के परतावा दिला जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी ए्रस्प्रेसरेल्वे गाड्याची ऑनलाइन बुकिंग हाऊसफुल्ल झाले होते. तत्पूर्वी लॉकडाउनची मुदत वाढल्यास तिकिटाचा परतावा मिळेल   अशा ऑनलाइन सूचनाही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, गावी जाण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी जाण्याच्या  निमित्ताने प्रवाशांनी तिकीट बुकिंग केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याममुळे आता रेल्वेचे प्रवासी सेवा 3 मेपर्यंत   बंदच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता प्रवाशांनी ऑनलाइन तिकिटे रद्द करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी ऑनलाइन तिकिटे रद्द केल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार

सुपर चेस क्लासिकच्या सलामीच्या सामन्यात प्रज्ञानंद फिरौजाविरुद्ध खेळणार, गुकेशने माघार घेतली

नवी मुंबईत भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र उभारले जाणार, सिडको आणि एआयईएफ यांच्यात मोठा करार

IMDचा मुसळधार पावसाचा इशारा: या राज्यांसाठी 'Heavy Rain Alert '; २१ मे पर्यंत अशीच हवामान स्थिती कायम राहणार

चाळीसगाव येथे लसीकरणानंतर अडीच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments