suvichar

वाचा, टोकियो ऑलिम्पिक कधी होणार

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (07:17 IST)
जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे. २०२१ साली होणाऱ्या या स्पर्धेच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. 
 
गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्या-ज्या संघटनांनी हातभार लावला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे. जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले. इतर महत्वाच्या स्पर्धांसोबत ऑलिम्पिकचं आयोजन होणार नाही याची काळजी घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

अशोक खरात प्रकरणात नवे वळण, वडेट्टीवार यांनी एचआयव्हीच्या प्रसाराबद्दल चिंता व्यक्त केली

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, अनुष्का शर्माला पहिल्यांदाच स्थान मिळाले

कोलंबिया विमान अपघात 66 जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप बेपत्ता

पुढील लेख
Show comments