Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीत रोस्टेड ड्राय फ्रूट्स खा, पण खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (12:07 IST)
जर तुम्ही नवरात्री दरम्यान उपवास करत असाल तर पाण्याव्यतिरिक्त तुम्ही निरोगी गोष्टी देखील खाल्ल्या पाहिजेत. कोरोना महामारीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. उपवासादरम्यान भाजलेले ड्राय फ्रूट्स खाणे हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. जर तुम्हाला सुकामेवा सहज पचत नसेल, तर तुम्ही ते रोस्ट करुन खाऊ शकता. यामुळे शरीरातील पोषक घटकही पुरतील आणि भूक लागणार नाही. नवरात्रीच्या उपवासादरम्यान हा निरोगी आहाराचा पर्याय आहे.
 
साहित्य- 
50 ग्रॅम काजू
50 ग्रॅम बादाम
50 ग्रॅम मनुका
2-3 टेबलस्पून खरबूज बियाणे
2-3 टेबलस्पून पांढरे तीळ
तुप आवश्यकतेनुसार
 
कृती- 
सर्वप्रथम, एका कढईत मध्यम आचेवर तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम होताच सर्व एक एक करून भाजून घ्या. यानंतर सर्व गोष्टी एकत्र करा आणि थंड होण्यासाठी ठेवा. भाजलेले ड्राय फ्रूट्स तयार आहेत. त्यांना एका एअर टाइट कंटेनरमध्ये साठवा.
 
टिपा
तुपाऐवजी तुम्ही घरच्या बटरमध्ये सुकामेवा भाजू शकता. 
ज्यांना सुकामेवा सहज पचत नाहीत, ते रात्री पाण्यात भिजवू शकतात आणि सकाळी भाजून घेऊ शकतात. 
मखना भिजल्याशिवाय भाजता येतो.

रोस्टेड ड्रायफ्रूट्स उपवासात दुधाबरोबर खावेत.
जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर रिकाम्या पोटी सुकामेवा खाणे टाळा.
ड्रायफ्रूट्ससह रस, दूध घ्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments