Festival Posters

उरूग्वेने रशियाला हरविले

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (11:00 IST)
रशियात खेळल जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 'अ' गटाच्या साखळी सामन्यात उरूग्वेने यजमान रशिाचा 3-0 असा पराभव केला.
 
या विजयासाह उरूग्वेने 'अ' गटात पहिले स्थान घेतले आहे. पहिल्या सामन्यात उरूग्वेने इजिप्तचा पराभव केला होता. दुसर्‍या सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाला नमविले होते. सोमवारी रशियाला नमवून उरूग्वेने 'अ' गटातील तिन्ही साखळी सामने जिंकून नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे.
 
यजमान रशियाने सौदी अरेबियाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी इजिप्तचाही पराभव करून पुढची फेरी निश्चित केली होती. काल त्यांचा पराभव झाला तरीही रशियाने सहा गुणांसह याच गटातून दुसरे स्थान मिळविले आहे. दोन्ही संघांनी पुढची बाद फेरी गाठली आहे.
 
सोवारी या दोन्ही संघामध्ये खेळले गेलेल्या साखळी लढतीत लुईस सुआरेजने फ्री किकवर गोल केला. त्यानंतर डेनिस चेरीशेव्ह याने रशियाकडून आत्मघाती स्वयंम गोल केला. 90 व्या मिनिटास कबानीने तिसरा गोल करून उरूग्वेला 3-0 असा विजय मिळवून दिला. यजमान रशियाचा साखळी सामन्यातील हा पहिला पराभव ठरला.
 
उरूग्वेने मात्र एकही सामना गामवलेला नाही. दीएगो लेक्सॉल्ट याचा फटका रशियाच्या चेरीशेव्हला लागून जाळीत गेला. त्यामुळे हा स्वयंम गोल ठरला. एवढ्यावरच भागले नाही रशियाच्या अडचणी आणखी वाढल्या. रशियाचा खेळाडू इगोर स्मोलनिकोव्ह याला 36व्या मिनिटास पिवळे कार्ड दाखविण्यात आले व त्याला मैदानाबाहेर जावे लागले. रशियाला उर्वरित वेळेत दहा खेळाडूंवर खेळावे लागले. सुआरेजने दहाव्या  मिनिटाला पहिला गोल केला व 26 व्या मिनिटाला दुसरा गोल झाला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

RCB vs LSG: बंगळूरने लखनौला ५ गडी राखून सहज पराभूत केले

LIVE: अंजली दमानिया यांचा गंभीर दावा: अजित पवार यांच्या मृत्यूचा जादूटोण्याशी संबंध

अमरावती : १८० मुलींचे लैंगिक शोषण! आरोपी अयानच्या घरावर चालवला बुलडोझर, नवनीत राणा म्हणाल्या-मृत्युदंडाची शिक्षा द्या

'कैसा हराया' व्हायरल एआयएमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्यावर मोठा आरोप, बनावट जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली; पद धोक्यात

पुढील लेख
Show comments