Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jyeshtha Gauri 2022 ज्येष्ठा गौरी 2022 आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजा विधी

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (16:17 IST)
पुराणात सांगितल्याप्रमाणे आणि परंपरेनुसार प्रत्येक कार्यांच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. सर्वप्रथम गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देव -देवतांची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केल्यानंतर मन वाट बघत असतं गौरीच्या आगमनाचे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गौरीचीही पूजा केली जाते. यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी असून 3 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन 4 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन व 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. 
 
पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी आणि मुहूर्त
ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख: 3 सप्टेंबर, शनिवार
वेळ: रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत
 
ज्येष्ठा गौरी पूजन तारीख: 4 सप्टेंबर, रविवार
 
ज्येष्ठा गौरी विसर्जन तारीख: 5 सप्टेंबर, सोमवार
वेळ: रात्री 8 वाजून 05 मिनिटांपर्यंत
 
अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन करुन नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जन होतं.
 
गौरीपूजन यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
 
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
 
पूजा विधी
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.
 
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी,१६ चटण्या,१६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात.संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो.अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या,घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments