Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योगिनी एकादशी 2019: व्रत केल्याने मिळेल पापांपासून मुक्ती, सुखाची प्राप्ती

Webdunia
दरवर्षी 24 एकादशी व्रत करण्याची प्रथा आहे. ज्या वर्षी मलमास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी याची संख्या वाढून 26 होते. त्यातून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे ही एकादशी सर्व पापांपासून मुक्ती देणारी आहे. तर जाणून घ्या या व्रताबद्दल महत्त्तवाची माहिती:
 
तामसिक भोजन करणे टाळावे
शास्त्रांप्रमाणे ही एकादशी करण्याच्या एका दिवसापूर्वी रात्रीपासून नियम पाळणे सुरू करावे. दशमी तिथीच्या रात्रीपासून ते द्वादशी तिथीच्या सकाळ पर्यंत दान कर्म करण्याने पाप नष्ट होतात. म्हणूनच दशमी तिथीपासूनच तामसिक भोजन करणे टाळावे. पुराणांमध्ये या व्रताला खूप महत्त्व दिले गेले आहे. या व्रत दरम्यान प्रभू विष्णू जागृत अवस्थेत असतात. नंतर देवशयनी एकादशी येते. ज्यानंतर प्रभू विष्णू चार महिन्यांसाठी शयन करतात.
 
पूजा विधी
यात एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि नित्यकर्माहून निवृत्त होऊन व्रत संकल्प घेण्याचा विधान आहे. पद्म पुराणानुसार या दिवशी तिळाच्या उटणे लावून नंतर स्नान करणे देखील शुभ मानले गेले आहे. या व्रतामध्ये प्रभू विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा विधान आहे.
 
पूजन करताना सर्वात आधी प्रभू विष्णूंना पंचामृताने स्नान करवावे. नंतर प्रभू विष्णू ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. नंतर चरणामृत स्वत: आणि कुटुंबाच्या सदस्यांवर शिंपडावे आणि तीर्थ म्हणून ग्रहण करावे. असे केल्याने शरीराचे सर्व आजार आणि वेदना नाहीश्या होतात असे मानले गेले आहे.
 
विष्णुसहस्त्रनाम पाठ करावा.
 
पद्म पुराणानुसार धनाध्यक्ष कुबेर प्रभू महादेवाचे परम भक्त होते. दररोज महादेवाच्या पूजेसाठी त्यांनी हेम नावाच्या माळ्याला फुलं निवडून आणण्याचे काम सोपवले होते. एकेदिवस कामात वशीभूत होऊन हम आपल्या पत्नीसह विहार करू लागला आणि वेळेवर फुलं पोहचवण्यात असमर्थ ठरला. तेव्हा क्रोधित होऊन कुबेर महाराजांनी सैनिकांना हेम माळ्याच्या घरी पाठवले. सैनिकांनी हेम माळी फुलं का आणू शकला नाही हे कारण सांगितल्यावर कुबेर आणखीच क्रोधित झाले. कुबेराने हेम माळ्याला कुष्ठ रोगाने पीडित होऊन पत्नीसह पृथ्वी जाण्याचा श्राप दिला. कुबेरच्या श्रापामुळे हेमला अलकापुरीहून पृथ्वीवर यावे लागले. एकदा ऋषी मार्कण्डेय यांनी हेमच्या दुःखाचे कारण जाणून घेल्यावर योगिनी एकादशी व्रत करण्याचा सल्ला दिला. या व्रतामुळे श्राप मुक्त होऊन पत्नीसह सुखरूप जीवन व्यतीत करू लागला.
 
योगिनी एकादशीच्या दिवशी दान देण्याचं देखील महत्त्व आहे. या दिवशी जल आणि अन्न दान करणे फलदायी ठरतं. तसेच कोणी आजारामुळे त्रस्त असेल तर या दिवशी प्रभू विष्णूंची उपासनासोबतच सुंदर कांड पाठ करवणे फलदायी ठरेल.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments