आपल्या संस्कृतीला जपणारा मराठमोळा खेळ म्हणजे भोंडला. नवरात्राच्या दिवसात घटस्थापनेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत खेळला जाणारा भोंडला किंवा हादगा.
पाटावर मधोमध हत्तीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून त्याचा भोवती फेर धरतात आणि गाणं म्हणतात. खास स्त्रिया आणि मुलींसाठी साजरा केला जाणाऱ्या भोंडल्याची काही निवडक गाणी आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत. या गाण्यांमध्ये जणू आपल्या जीवनाचे सारच सांगितले आहे. जे आपल्याला काही न काही जगण्याचा छानच संदेशच देतात. या मध्ये सर्वात आधी गणपती गजाननाला आवाहन करतात.
1) ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतंय पारावारी