Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय आपणही करता या 15 चुका

mistakes of life
Webdunia
गुरूवार, 14 मे 2020 (07:09 IST)
या 15 प्रकाराच्या लोकांना आयुष्यात पश्चात्ताप करावा लागतो, आपण तर नाहीत ह्यात आपल्या हिंदू धर्मात हजारो गोष्टी लिहिल्या आहेत. कोणी त्याचे पालन करतं तर कोणी नाही. धर्मात लिहिलेल्या हजारो गोष्टींपैकी निव्वळ काही गोष्टी जरी पाळल्या गेल्या तरी आपल्या जीवनात सुख आणि शांती येऊ शकते. 
 
1 बरेच लोकं या विचारात जगतात की आज नाही तर उद्या आपण आपले आरोग्य सुधारून घेऊ. धर्म सांगते की कुठल्याही त्रासाला आणि आजार हा किरकोळ समजणे आणि त्याचे औषधोपचार सुरुवातीला न करणे हे प्राणघातक असू शकतं. म्हणूनच काही त्रास आणि आजार असल्याचे समजतातच सर्व कामे बाजूला ठेवून आधी त्याचे उपचार आणि निदान करायला हवे. नाही तर आजार वाढायला वेळ लागत नाही. 
 
2 बहुतेक लोकं या विचारात असतात की तारुण्य आणि निरोगीपणा नेहमीच राहणार. ते या गोष्टींकडे लक्षच देत नाही की तारुण्य कधी ही टिकून राहत नाही. आज तारुण्यात वाया गेलेले बरेच तरुण मुलं- मुली दिसून येतात. 
 
3 असे दिसून आले आहे की बरेच लोकं दुसऱ्यांचा दुःखात सामील होत नाही. पण त्यांची अपेक्षा असते की कोणी आमच्या दुःखाच्या वेळी आम्हाला मदत करावी. अशावेळी हे लोकं अश्या लोकांकडे सुद्धा मदत मागण्यासाठी जातात, ज्यांचा दुःखात ते स्वतः सामील झालेच नाही. 
 
4 आजच्या काळात असे ही लोकं आढळून येतात. ज्यांनी क्वचितच आपल्या आई- वडिलांची सेवा केली असेल, पण आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांचे मुलं त्यांचा सांभाळ करतील. जे आपल्या आई- वडिलांशी तारुण्यपणात भांडणारे बरेच सापडतील. त्यांना त्यांचा म्हातारपणी खूप सोसावे लागते. हे गरूड पुराणात पण लिहिले आहे.
 
5 स्वतःला दुसऱ्यांपेक्षा शहाणे समजणारे अहंकारी लोकं जगात बरेच सापडतात. देवाने सगळ्यांना सारखेच बनविले आहे. देवाने प्रत्येकाला दोन हात, दोन पाय, कान, नाक आणि मेंदू दिले आहेत. जास्त शिकून किंवा विचार करून किंवा पैसे कमावून कोणी दुसऱ्यांपेक्षा चांगले बनत नसतं. भल्या मोठ्या महान शिकलेल्या व्यक्तींचे सुख दुःख गरीब आणि अज्ञानी माणसांसारखेच असतात.
 
6 बरेच लोकं असे समजतात की आपणं आज नाही तर उद्या नक्की हे काम करून घेऊ म्हणजे कुठल्याही कामाला अर्धवट सोडणे आणि उद्या करू हे विचार करून त्या कामाकडे दुर्लक्ष करणे आयुष्यात अपयशाला कारणीभूत असतात.
 
7 अशी बरेच लोकं आहेत जे स्वतः दुसऱ्यांशी वाईट वागतात आणि त्यांची अपेक्षा असते की सगळ्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे. असे लोकं नकारात्मक विचारांचे असतात. ते नेहमी दुसऱ्यांचे बोलणे पूर्ण होऊ देत नाही मधूनच त्यांची काट करून स्वतःचेच कौतुक करीत असतात.
 
8 आपण चांगले मत दिले तर त्याच्यांकडे दुर्लक्ष करण्याची अनेकांची सवय असते. असे लोकं इच्छा नसून पण दुसऱ्यांना आपले मत सांगत असतात. दुसऱ्यांच्या मताला मान न देणारे अश्या लोकांची अपेक्षा असते की त्यांचा शब्दांना मान द्यायला हवे. असे न केल्यास ह्यांना राग येतो.
 
9 बऱ्याचशा लोकांना दुसर्‍यांच्या प्रकरणात ढवळाढवळ करण्याची सवय असते. त्यामधून देखील असे असतात जे गरज नसताना सुद्धा दुसऱ्यांच्या घरात ढवळाढवळ करतात आणि परिस्थिती अजून वाईट मार्गावर आणून सोडतात. 
 
10 बऱ्याच लोकांची सवय आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलण्याची असते. ते सतत खोटं बोलतच राहतात. खोट्या शपथ घेत असतात. अश्या लोकांमध्ये ते लोकं येतात जे खोटं बोलून आपले मालाची विक्री करून लोकांची फसवणूक करतात.
 
11 आपल्या वाईट सवयींचा समर्थन करणारे, त्याला खरे ठरवणारे अनेक लोक असतात. जर त्यांना मद्यपानाची सवय असेल तर ते त्या वाईट सवयीला पण चांगले सिद्ध करतात. ते असे तर्क देतात की जे ते करत आहे ते बरोबर आहे. धर्माविरुद्ध कार्य करण्यासाठी सुद्धा ते त्या कार्यावर कुतर्काचे अंथरूण घालतात.
 
12 दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणारे या जगात अनेक लोक भेटतील. अश्या बायका पण असतात ज्या आपल्या नवऱ्याची फसवणूक करून दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवतात. त्यांच्यासोबत वास्तव्यास असतात. असं करणं आपल्या कौटुंबिक समाजाच्या नैतिकतेविरुद्ध आहे. अश्या लोकांना बघून काही जण त्यांचा विरोध करतात. तर काही जण त्यांचा सारखे जीवन जगण्याचा विचार करतात. धर्माच्या दृष्टीने अश्या प्रकाराच्या अनैतिक संबंधाचा समर्थन करणारेसुद्धा गुन्हेगार असतात.
 
13 असे बरेच लोकं आहे जे प्रत्येकजणा समोर आपले दुःख आणि वेदना सांगत असतात. आपल्या घराचे भेद सांगत राहतात. अशाने आपल्या घरात आणि कुटुंबाचे वातावरण विखरून जाते. असे लोक कमकुवत असलेले मानले गेले आहे. अश्या लोकांचे शोषण इतर लोक ही करतात.
 
14 बरेच लोकं चित्रपट, नशा, पान, अश्या सवयींवर पैसे खर्च करतात. पण आपल्या दुकानात किंवा घरी आलेल्या गरिबाला हाकलून देतात.
 
15 असे बरेच लोकं असतात जे आपले तोंड कधीही बंद ठेवत नाही सतत बोलतच राहतात. कधी पण दुसऱ्यांना बोलण्याची संधी देतच नाही. प्रत्येक गोष्टीत मग त्या बद्दल त्यांना माहिती असो किंवा नसो आपले विचार मांडत असतात. असे ते विचार न करता करत असतात. असे लोकं नकारात्मक विचारांचे असतात. ते नेहमीच नकारात्मक बोलत असतात. त्यांचा तोंडून नेहमी कडू शब्दच येतात. आपण अश्या लोकांशी संवाद साधू शकतं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मारुती स्तोत्र मराठी अर्थासह Maruti stotra with meaning in marathi

Hanuman Jayanti 2025 बजरंगबलींना विशेष नैवेद्य अर्पण करा

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments