Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 61 ते 70

nivruttinath maharaj
Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (15:30 IST)
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य । आणि हा अभेद भेद नाहीं ॥१॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें । यशोदे निर्धारे प्रेमसुख ॥२॥
हारपती दिशा सृष्टीचा कडवसा । आपरूपें कैसा वोळलासे ॥३॥
निवृत्तिसाधन वसुदेवखूण । गोपिकाचें धन हरी माझा ॥४॥
 
निराकृती धीर नैराश्य विचार । परिपूर्ण साचार वोळलासे ॥ १ ॥
तें रूप रूपस सुंदर सुरस । तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥ २ ॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे । तो प्रत्यक्ष स्वरूपें नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर । साकार श्रीधर गोपवेष ॥ ४ ॥
 
आदि मध्ये वावो अवसान अभावो । पाहाताती निर्वाहो हरपला ॥ १ ॥
तें रूप माजिटें गोपवेश खेळे । नंदाचे सोहळे पुरविले ॥ २ ॥
धन्य ते यशोदा खेळवी मुकुंदा । आळवीत सदा नित्य ज्यासी ॥ ३ ॥
निवृत्तिसधर ब्रह्मरूपसार । वृत्तीचा विचार हरपला ॥ ४ ॥
 
जेथें रूप रेखा ना आपण आसका । सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥
तें रूप गोजिरें नंदाघरीं असे । जनीवनीं दिसे गोपिकांसि ॥ २ ॥
नादभेद कळा जेथें भेद नुठी । ब्रह्मरूपें तुष्टि अवघी होय ॥ ३ ॥
निवृत्ति जन जन वन देख । आत्मरूपभाव ब्रह्म जाला ॥ ४ ॥
 
मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद । रूपरस गोविंद गुणनिधी ॥ १ ॥
तें रूप सुरवर सेविती अरुबार । नित्यता सविचार भोगिताती ॥ २ ॥
गौळिया गोजिरें दैवत साचारें । नंदासि एकसरे प्रेम देत ॥ ३ ॥
निवृत्ति निवाला प्रेमरसें धाला । सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥ ४ ॥
 
विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी । नामाची पर्वणी भक्तांलागी ॥ १ ॥
तें रूप संपूर्ण वसुदेवाकुळीं । यादव गोपाळीं वोळलासे ॥ २ ॥
व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार । तें रूप तदाकार भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट आपण वैकुंठ । कृष्णनामें पेठ गोकुळीं रया ॥ ४ ॥
 
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक । वैकुंठव्यापक जीवशिव ॥ १ ॥
तें रूप सुंदर नंदाघरीं वसे । जनीवनीं वसे कृष्णरूप ॥ २ ॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण । आनंदपुर्णघन गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार । भाग्य पारावार यशोदेचें ॥ ४ ॥
 
त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग । एकरूप सांग वोघवतसे ॥ १ ॥
तें रूप सावळें भाग्ययोगें वोळे । नंदाचे सोहळे पाळियेले ॥ २ ॥
श्रुतिप्रतिपाद्य शास्त्रांसि जें वंद्य । निर्गुणाचें आद्य भाग्यनिधि ॥ ३ ॥
निवृत्ति नितंब रूपस स्वयंभ । कृष्णनामें बिंब बिंबलेंसे ॥ ४ ॥
 
ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें । एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥
तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं । नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥
न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी । तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी । मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥
 
विकट विकास विनट रूपस । सर्व ह्र्षिकेश दिसे आम्हां ॥ १ ॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें । उन्मनिनिर्धारे भोगूं आम्हीं ॥ २ ॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा । लेशु त्या पापाचा नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें सुखरूप कृष्ण । दिननिशीं प्रश्न हरि हरि ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gangaur Vrat Katha गणगौर व्रत कथा, नक्की वाचा

Kamada Ekadashi 2025 कामदा एकादशी कधी? पूजन मुहूर्त आणि नियम जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

Ram Navami 2025 Speech in Marathi रामनवमी वर भाषण या प्रकारे तयार करा

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments