Festival Posters

श्री संतोषीमाता नमनाष्टक

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (10:53 IST)
जय जयाजी देवी भगवती । भक्तवत्सले कारुण्यमूर्ती ।
अनंत वरदे पावसी संकटी । माते संतोषी नमो नमः ॥१॥
 
जगत्‌कल्याणी अतिसुखदायक । सर्वेश्वरी तू अरिकुलघातक ।
वारिसी समस्त दुःखे विदारक । माते संतोषी नमो नमः ॥२॥
 
नानावतारी सज्जन-रक्षक । मूळपीठस्वामिनी भवभयहारक ।
शक्तिस्वरूपा मुख्य प्रबंधक । माते संतोषी नमो नमः ॥३॥
 
दिव्य तेजस्विनी स्वयंप्रकाशित । गुणवती महत्‌किर्तीवंत ।
नित्य अनादी चराचरी व्याप्त । माते संतोषी नमो नमः ॥४॥
 
अगाध करणी विश्वीं अगोचर । तारिसी भक्ता निजकृपे सत्वर ।
भावे प्रार्थिता धावसी तत्पर । माते संतोषी नमो नमः ॥५॥
 
शरण भुवनत्रय तव चरणांसी । हरि-हर-ब्रह्मा गाती स्तवनासी ।
तुझीया दर्शने सुख संतांसी । माते संतोषी नमो नमः ॥६॥
 
श्रेष्ठ पवित्र चरित्र महती । प्रेमस्वरूपिणी तू यशवंती ।
तव प्रसादे श्री आणि कीर्ती । माते संतोषी नमो नमः ॥७॥
 
थोर महिम्न म्हणूनी सुरगण । असती तुझिया चरणी लीन ।
पुरवी मनोरथ रक्षी निशिदिन । माते संतोषी नमो नमः ॥८॥
 
॥ इति जितेन्द्रनाथ रचित श्रीसंतोषीमाता नमनाष्टक संपूर्ण ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

चतुर्थी व्रत विशेष का आहे? उपवास केल्याने काय होते?

Artihara-stotram आर्तिहर स्तोत्रम् श्रिधर अय्यावाल्

सोळा सोमवार व्रत नियम

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments