५१ आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥ ५२ माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टाळिलें...