२००१ रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥१॥ आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥ध्रु.॥ रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥२॥ तुका म्हणे केलें कळिकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥३॥ २००२ वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही...