Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विनायक चतुर्थीला काय करावे

Webdunia
मंगळवार, 16 मार्च 2021 (17:30 IST)
प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
 
विनायकी चतुर्थीला काय करावे
स्नान करून धूतवस्त्र नेसावे. 
घरात स्वच्छ ठिकाणी अगर देव्हार्‍यासमोर एक स्वच्छ पाट ठेवावा
त्यावर पिंजरीने एक आठ पाकळ्यांचे कमळ काढावे. 
त्यावर सोन्याचांदीची अगर तांब्यापितळेची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवावी.
मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेऊन पूजा करावी. 
 
आचमन करून
केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः ।
असे म्हणत तीन पळ्या पाणी उजव्या तळहातावर घेऊन प्राशन करावे आणि
गोविंदाय नमः ।
असे म्हणत चौथी पळी पाणी हातावरून ताम्हणात सोडावे. ते पाणी तुळशीत टाकून इच्छा असल्यास मूर्ती अगर सुपारी ताम्हणात ठेऊन स्नान घालावे. त्यानंतर पंचामृत 
 
स्नान घालावे. हा विधी दुर्वांनी मूर्तीवर अगर सुपारीवर असलेल्याच ठिकाणी पाणी व पंचामृत शिंपडूनस्नानं-पंचामृतस्नानं समर्पयामि असे म्हणावे.
 
वस्त्र-वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि ।
असे म्हणून कुंकू लावलेले वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. गंध-तांबडे किंवा पांढरे गंध लावावे
 
चंदनं समर्पयामि
चंदन अर्पित करत नमस्कार करावा.
 
हरिद्रांच कुंकुमं समर्पयामि ।
हळद-कुंकू लावावे.
 
अक्षतां-विनायकाय नमः ।
अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।
म्हणून पिंजर लावलेल्या लाल अक्षता वाहाव्या.
 
फुले-पुष्पाणि समर्पयामि
म्हणून फुले अर्पण करावी.
 
दुर्वा-दुर्वांकुरान् समर्पयामि
म्हणत दुर्वा वाहाव्या.
 
धूपं-विनायकाय नमः ।
असे म्हणून सुगंधी उदबत्ती लावून देवाला धूपं-समर्पयामी म्हणत ओवाळावे. 
 
दीप-निरंजनाची वात पेटवून 
निरांजनदिप समर्पयामि
असं म्हणून ओवाळावे.
 
नैवेद्य-नैवेद्यार्थे स्वाद्यवेद्यं समर्पयामि
असे म्हणून गूळखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा व
 
नमस्करोमि
असे म्हणून नमस्कार करावा. 
 
प्रदक्षिणा व पुष्पांजलि-गंध, अक्षता व फुल हातात घेऊन देवाभोवती अगर आपल्याच भोवती १, ३ किंवा ५ प्रदक्षिणा घालून
प्रदक्षिणां समर्पयामि
म्हणावे व हातातील पुष्पांजलि
पुष्पांजलि समर्पयामि
असे म्हणून देवावर वाहावी. 
 
पूजा झाल्यावर प्रार्थना म्हणावी -
 
विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत । पार्वतीप्रीव विघ्नेश मम विघ्नान्निवाराय ॥
नमो विष्णूस्वरूपाय, नमस्ते रुद्ररूपिणे । नमस्ते ब्रह्मरूपाय, नमोऽनन्तस्वरूपिणे ॥
नमस्कारान् समर्पयामि ।
नमस्कार करावा आपले मागणे देवाकडे मागावे. 
॥ श्री विनायकार्पणमस्तु ॥
 
विसर्जन -
संध्याकाळी उदबत्ती ओवाळून देवावर पाणी शिंपडावे व पुनरागमनायच असे म्हणून मूर्ती अगर पूजेला लावलेली सुपारी हलवावी. अशा रीतीने, श्रद्धेने विनायकी चतुर्थी व्रत 
 
पूजन करून आपल्या सवडीप्रमाणे पोथी मात्र अवश्य वाचावि रात्री नामस्तोत्र म्हणावे. पूजेनंतर गणपतीच्या आरत्या म्हणाव्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments