Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

२६/११ हल्ल्यातील आणखी एका मोठ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू

Webdunia
रविवार, 3 मार्च 2024 (11:00 IST)
लाहोर : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा इंटेलिजन्स प्रमुख आझम चीमाचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. 70 वर्षाच्या चीमाने फैसलाबाद येथे अखेरचा श्वास घेतला. आझम चीमाचा मृत्यू हार्ट अटॅकेने झाल्याच बोलल जातय. पण पाकिस्तानच्या जिहादी वर्तुळात संशयाच वातावरण आहे.
 
आझम चीमाचा मृत्यू हाट अटॅकनेच झाल्याबद्दल अजूनही अनेकांना खात्री नाहीय. काही जिहादींच्या मनात भिती, संशय आहे. कारण मागच्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक दहशतवादी रहस्यमयी पद्धतीने मारले गेले आहेत.
 
खासकरुन भारतविरोधी दहशतवाद्यांना वेचून-वेचून संपवण्यात येतय. लष्कर-ए-तोयबाचे जे दहशतवादी मारले गेल, त्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
मुंबईवर 2008 साली 26/11 भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. आजही या हल्ल्याच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा सडा पाडला होता. अनेक निरपराध, निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. आझम चीमा हा मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक होता.
 
भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफीज सईद या हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड होता. आता इतक्यावर्षांनी या हल्ल्यामागच्या अनेक सूत्रधारांना वेचून, वेचून मारल जातय. यामागे कोण आहे? या बद्दल अजूनही कोडच आहे.
 
मात्र या अशा दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे भारताविरोधात कारस्थान रचणारे दहशतवादी अजूनही पाकिस्तानात आहेत, यावर शिक्कामोर्तब होतं. कारण हे दहशतवादी पाकिस्तानात असल्याच पाकिस्तानने वारंवार फेटाळून लावलय. 

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments