Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंगापूरहून चीनला जाणाऱ्या बोइंग विमानात बिघाड, सात प्रवाशी जखमी

Webdunia
शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (15:47 IST)
सिंगापूरहून चीनला जाणाऱ्या बोइंग 787-9 ड्रीमलायनर विमानात बिघाड झाल्याने सात प्रवासी जखमी झाले आहेत. ज्या विमानात बिघाड झाला ते विमान चालवणाऱ्या एअरलाइन कंपनीचे नाव स्कूट आहे. वृत्तानुसार, ग्वांगझूमध्ये सुरक्षित लँडिंग केल्यानंतर एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एअरलाइन्स स्कूटने सांगितले की शुक्रवारी सकाळी विमान ग्वांगझूजवळ आले तेव्हा क्रूने त्रुटीची तक्रार केली. यानंतर या बोईंग787-9 ड्रीमलायनर श्रेणीच्या विमानात गोंधळ उडाला. या गोंधळात चार प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स जखमी झाले. 
 
स्कूट एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक TR100 पहाटे 5.45 वाजता सिंगापूरहून निघाले होते. उड्डाणानंतर सुमारे तीन तासांनी टर्ब्युलेंस आढळले. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.10 वाजता विमान चीनमधील ग्वांगझू येथे सुरक्षितपणे उतरले. स्कूट कंपनीच्या म्हणण्यानुसार, पीडितांना ग्वांगझूमध्ये आल्यानंतर तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. 6 सप्टेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 वाजता एका जखमी प्रवाशाला निरीक्षणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विमान 35 हजार फुटाच्या उंचीवर असून विमानात बिघाड जाणवली. विमान 35 हजार फुटीवरून 25 हजाराच्या फुटीवर आले. जेव्हा परिस्थिती सामान्य झाली तेव्हा विमानाची मूळ उंची आणि वेग परत मिळवण्यात यश आले.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments