suvichar

दहशतवादी हाफिसवर कारवाई करा अमेरिकेचा पाकला दम

Webdunia
शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:51 IST)
अमेरिकेने पुन्हा दहशतवादी देश पाकिस्थानचे कान टोचले आहेत. आतंकवादावर जोरदार टीका करत आपल्या देशात मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची वाचवत आह्रेत म्हणून  पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं झापले आहे. या प्रकरणात अमेरिका असे म्हणते की हाफिस  सईदला आम्ही दहशतवादी समजतो, त्यामुळे पाकिस्ताननं त्याच्यावर लवकर कठोर  कारवाई करावी  अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉर्ट यांनी माध्यमांसमोर आपले मत मांडले आहे. 

 पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले होते. हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान केले होते. यामध्ये पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं  घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी असे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की  हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र  कोणी व्यक्तीने जर  त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला तर सरकार कारवाई करेल, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले आहेत, त्यामुळे लगेच अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असंही हिथर नॉर्ट यांनी सुनावलं आहे.  त्यामुळे आता पाकिस्थानला लवकरात लवकर कारवाई करणे भाग पडणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जळगाव प्रेमप्रकरण रक्तरंजित! १२ वर्षांच्या संसाराला गोळीचा शेवट

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

भांडुपमध्ये ८वीच्या मुलांनी मित्राला संपवलं! तलावात फेकला मृतदेह

उन्नावमध्ये एक्सप्रेसवेवर उभ्या असलेल्या ट्रकला रोडवेज बसची धडक, तीन प्रवाशांचा मृत्यू, ३१ जण जखमी

दिल्लीत बॉम्बची धमकी: तीन बँका आणि सहा शाळा उडवण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments