Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय वंशाच्या प्रीती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री, साजीद जावेद अर्थमंत्रिपदी

Webdunia
- गगन सभरवाल
बोरिस जॉन्सन यांची ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. या निवडीसोबतच त्यांनी ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
 
युनायटेड किंग्डमचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर पाकिस्तानी वंशाचे साजिद जावेद यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
2017 साली इस्रायली अधिकाऱ्यांबरोबर अनधिकृत भेटीगाठी घेतल्यामुळ प्रीती पटेल यांना राजीनामा द्यावा लागला होता. बोरिस यांच्या मंत्रिमंडळात डॉमिनिक राब यांना परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे.
 
थेरेसा मे बुधवारी बंकिंगहम पॅलेसमध्ये गेल्या आणि त्यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. आता बोरिस जॉन्सन यांनी थेरेसा मे यांची जागा घेतली आहे.
 
बोरीस जॉन्सन महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसाठी त्यांना 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये त्यांना बहुमत आहे का, याबद्दल महाराणी एलिझाबेथ यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे ते ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आर्यलंडचे 55 वे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली.
 
जॉन्सन हे महाराणी एलिझाबेथ यांच्या कार्यकाळातील 14 वे पंतप्रधान आहेत. एलिझाबेथ जेव्हा महाराणी झाल्या तेव्हा त्यांच्या कार्यकाळात विन्स्टन चर्चिल पहिले पंतप्रधान होते.
 
शपथविधीनंतर बोरीस जॉन्सन औपचारिकरित्या 10 डाउनिंग स्ट्रीटला राहायला जातील. 10 डाउनिंग स्ट्रीट ब्रिटनच्या पंतप्रधानांचं सरकारी निवासस्थान आहे.
 
जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता असलेले भारतीय वंशाचे अनेक खासदार आहेत.
 
प्रीती पटेल
प्रीती पटेल माजी आंतरराष्ट्रीय विकास सचिव आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक केल्यामुळे त्यांना 2017 साली राजीनामा द्यावा लागला होता.
 
47 वर्षांच्या प्रीती पटेल यांचा जन्म लंडनमध्येच झाला. त्यांचे आई-वडील मूळचे गुजरातचे आहेत. मात्र, त्यानंतर ते युगांडाला गेले. 1960च्या दशकात ते लंडनमध्ये स्थायिक झाले.
 
प्रीती पटेल खूप तरुण वयात कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सदस्य बनल्या. त्यावेळी त्या 20 वर्षांच्याही नव्हत्या. जॉन मेजर त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते. प्रीती पटेल 2010 सालापासून विटहमच्या खासदार आहेत.
 
बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात त्यांना गृहमंत्रीपद मिळाले आहे.
 
आलोक शर्मा
51 वर्षांच्या आलोक शर्मा यांचा जन्म भारतातल्या आग्र्यामधला. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षीच ते आई-वडिलांसोबत ब्रिटनमधल्या रीडिंगमध्ये स्थायिक झाले.
 
ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राजकारणात येण्याआधी ते 16 वर्ष बँकिंग क्षेत्रात होते.
 
शर्मा 2010 सालापासून रीडिंग वेस्टचे खासदार आहेत. त्यांनाही बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचं पद मिळालं आहे.
 
जून 2017मध्ये शर्मा हाउसिंग मिनिस्टर (गृहनिर्माण मंत्री) होते. त्यांच्या कार्यकाळात ग्रेनफेल टॉवरला आग लागली होती.
 
5 जुलै 2017 रोजी या आगीसंदर्भात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्पष्टीकरण देताना ते भावूक झाले होते. त्यामुळे मीडियात त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
 
जानेवारी 2018 मध्ये ते रोजगार विषयक राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
ऋषी सुनक
या दोघांव्यतिरिक्त ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यांच्याकडे चिफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी हे पद सोपविण्यात आले आहे.
 
ऋषी यांनी ऑक्सफोर्डमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई मेडिकल स्टोअर चालवायच्या. ऋषी सुनक रिचमंडमधून खासदार आहेत.
 
कुलवीर रांगड
कुलबीर बोरीस जॉन्सच यांचे जवळचे मित्र आणि समर्थक आहेत. ते भारतीय वंशाचे शीख आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्येच झाला. याआधीही त्यांनी जॉन्सन यांचे डिजिटल सल्लागार म्हणून काम केलं आहे.
 
ते खासदार नाहीत. मात्र, 2018च्या दरम्यान लंडनच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ते कॉन्झर्वेटिव्ह पक्षाकडून उमेदवार होते.
 
मे 2018 मध्ये बोरीस जॉन्सन यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ते जॉन्सन यांच्या वाहतूक धोरणाचे संचालक होते.
 
44 वर्षांच्या कुलवीर रांगड यांच्या गाठीशी लंडनमध्ये ऑयस्टार कार्ड यंत्रणा लागू करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे बोरीस त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
2011 साली रांगड पर्यावरण आणि डिजिटल लंडनचे संचालक झाले. त्यांच्या कामामुळेच लंडनमध्ये बाईक चोरीच्या घटनांना आळा बसला. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी लंडनमध्ये नवीन इलेक्ट्रिक कार चार्जर लावण्यात आले.
 
सध्या ते एटोस युके अँड आय कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments