Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुसच्या विद्यापीठात गोळीबार,8 जण ठार,काहींनी इमारतीवरून उडी मारली ,बघा व्हिडीओ

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (15:47 IST)
रुसच्या एका विद्यापीठात गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे या मध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण विद्यापीठात खळबळ उडाली आणि विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उडी मारून पळ काढण्यास सुरुवात केली.सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात विद्यार्थी किती घाबरले होते हे पाहिले जाऊ शकते.या घटनेत किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
रुसच्या पर्म शहरातील एका विद्यापीठात सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले तर सहा जण जखमी झाले. रशियन तपास समितीने ही माहिती दिली. पर्म क्षेत्राच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 लोक जखमी झाले आहेत. जखमींविषयी येणारे वेगवेगळे आकडे जुळवता आले नाहीत.
 
 
रशियाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की बंदूकधारीला नंतर ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर चौकशी समितीने हत्येचा तपास सुरू केला आहे. सरकारी तास वृत्तसंस्थेने एका अज्ञात कायदेशीर स्रोताचा हवाला देत सांगितले की, काही विद्यार्थ्यांनी एका इमारतीच्या खिडकीतून उडी मारली.प्रादेशिक आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जखमींना गोळ्या लागल्या आणि त्यांनी इमारतीमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे गंभीर इजा झाली आहे..
 


 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments