Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, ४० वर्षानंतर चित्रपटांवरची बंदी उठली

Webdunia
शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:22 IST)
सौदी अरेबिया या देशात तब्बल चाळीस वर्षानंतर  चित्रपटांवर असलेली बंदी उठविण्यात आली.  या देशातील पहिल्या चित्रपटगृहात बुधवारी चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटगृहात सध्या फक्त व्हीआयपींसाठीच चित्रपट दाखवले जात असून सामान्य नागरिकांना अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. सध्या गाजत असलेला ब्लॅक पँथर हा चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. 

सौदी अरेबियामध्ये १९८० साली चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. चित्रपट पाहणे इस्लामविरोधी असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली होती. मात्र आता तब्बल ४० वर्षांनी ही बंदी उठविण्यात आली असून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटगृहे बांधण्याचे काम सुरू आहे. २०३० पर्यंत सौदी अरेबियात ३५० चित्रपटगृहे बांधण्यात येणार असून यात २५०० स्क्रीन असणार आहेत.  सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स सलमान यांनी देशाला आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही बंदी उठविल्याचे बोलले जात आहे. 

 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments