Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Thailand : गोळीबारात चिमुकल्यांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (16:38 IST)
थायलंड : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतातील बाल संगोपन केंद्रात झालेल्या गोळीबारात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकूण 22 मुले आणि 12 प्रौढांचा समावेश आहे. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते अचायॉन क्राथोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नॉन्ग बुआ लम्फू प्रांतात घडली. मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, 34 जणांची हत्या केल्यानंतर हल्लेखोराने आपल्या मुलाला आणि पत्नीवरही गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:लाही गोळी मारली. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलिस प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
 
माजी पोलीस अधिकारी या घटनेचा गुन्हेगार आहे 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर घटनेचा गुन्हेगार हा माजी पोलीस अधिकारी आहे. काही काळापूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अनेकांनी आश्रय घेण्यासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.

Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments