Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनव योजना, ब्रिटनमध्ये हॉटेलचे ५० टक्के बिल सरकार भरणार

Webdunia
शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:27 IST)
करोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्येही लॉकडाउन होता. त्यामुळे तिथे हॉटेल व्यवसाय कोलमडून पडला आहे. या उद्योगाला सावरण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. यूकेमधील ५३ हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेसना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांचे हॉटेलमधील खानपानाचे ५० टक्के बिल सरकार भरणार आहे. 
 
‘इट आऊट टू हेल्प आऊट’ या योजनेतंर्गत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सोमवार ते बुधवारपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्याव्यतिरिक्त अन्य पेयांवर ५० टक्के सवलतीपासून प्रतिव्यक्ती १० पाऊंडापर्यंत सवलत मिळणार आहे. पार्सलधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 
“आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये हॉटेल्स, कॅफे आणि बार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. दहालाखापेक्षा जास्त लोक या उद्योगात काम करतात. त्यांना करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू” असे ऋषि सनक यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेसमध्ये यावे आणि या क्षेत्रातला रोजगार टिकून रहावा यासाठी यूके सरकारने ही अभिनव योजना आणली आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments