suvichar

फेसबुक लवकरच डेटिंग फीचर आणणार

Webdunia
गुरूवार, 3 मे 2018 (15:36 IST)
तरुणांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लवकरच डेटिंग फीचर आणणार असून केवळ डेटिंगसाठीच नाही तर तरुण तरुणींमधील हे नातं अधिक घट्ट व्हावं, दीर्घ काळ टिकावं असा त्याचा उद्देश आहे, असं सांगितलं जात आहे. अनेक लोक आपला आयुष्यभराचा साथीदार शोधण्यासाठी फेसबुक वापरतात. त्यामुळे डेटिंगपासून सुरुवात करून विवाहबद्ध होण्यापर्यंत फेसबुक एखाद्या मध्यस्तासारखी मदत करणार आहे.
 
 

फेसबुकच्या माहितीनुसार, हे फीचर मुख्य अॅपचाच भाग असेल. तसेच हे फीचर सर्वांसाठी ऑप्शनल असेल. हे फीचर वापरावं की नाही ते अकाऊंट हाताळणाऱ्यावर अवलंबून असेल. यामध्ये प्रायव्हसी आणि सेफ्टी या दोन्हींचा विचार केला गेला आहे. ही माहिती कोणालाही देण्यात येणार नाही. तसेच तुमचे फेसबुक फ्रेंडस् देखील हे पाहू शकणार नाहीत. केवळ जे लोक डेटिंग प्रोफाईल वापरत असतील असेच लोक एकमेकांना डेट करू शकतील. मात्र फेसबुक फ्रेंड जर हे फीचर वापरत असतील तर त्यांची माहिती आपल्याला मिळेल का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अद्याप या फीचरची तपासणी सुरू आहे. मात्र काही महिन्यांतच हे फीचर सगळ्यांना वापरता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भ-मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट, तर कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

UK Youngest Mayor Tushar Kumar २३ वर्षीय भारतीय वंशाचे तुषार कुमार ब्रिटनचे सर्वात तरुण मेयर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी अखिलेश पेशवे यांची कुलगुरू पदावर नियुक्ती

दुधानंतर, आता 'ब्रेड'लाही महागाईचा फटका! मुंबईत किमती ₹५ पर्यंत वाढल्या

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पुण्याच्या कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments