Festival Posters

या सहा अ‍ॅप्सवरून 200 देशांतील युजर्सचा डेटा लीक

Webdunia
गुगल प्ले स्टोअरवरील 6 अ‍ॅप्सवरून जगभरातील 200 देशांतील युजर्सचा डेटा लीक होत असल्याची धक्कादायक   माहिती समोर आली आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्‌सअ‍ॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅट युजर्सचा डेटा लीक करीत असल्याचे उघड झाले आहे. व्हॉट्‌सअ‍ॅप हे सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम म्हणून पाहिले जाते. 
 
भारतासह जगभरातील 200 देशांतील व्हॉट्‌सअ‍ॅप, फेसबुक आणि स्नॅपचॅट युजर्सचा डेटा स्पायवेअरच्या माध्यमातून लीक करणे सुरू होते. गुगल प्ले स्टोअरमधील सहा अ‍ॅप्सच्या माध्यमातून हा लीकचा प्रकार सुरू होता. हे सहा अ‍ॅप्स अँड्रॉयड युजर्सनी आतापर्यंत 1 लाखांहून अधिक डाउनलोड केले आहेत. DROIDSMOBSTSPY 
 
असं या स्पायवेअरचे नाव आहे. हा स्पायवेअर Flappy firr, Flappy Birr Dog, Flashlight, HZPermis Pro rabe, Win 7Simulator आणि Winlauncher  या सहा अ‍ॅप्सच्या माध्यमातून डेटा लीक करीत होता. 
 
एखाद्या युजर्सने या स्पायवेअरच्या अ‍ॅपला डाउनलोड केले तर हा स्पायवेअर त्या डिव्हाइसच्या इंटरनेट कनेक्शनला हॅक करून आपल्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला जोडण्याचे काम करीत होता. कनेक्शन झाल्यानंतर डिव्हाईसची सर्व माहिती सहजपणे हॅक केली जात होती, असे एका संशोधनातून समोर आले आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून हॅकर्स हे कॉल डिटेल्स, कॉन्टॅक्ट्‌स, पर्सनल मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ फाइल आणि फोटो हॅक करीत होता. तसेच व्हॉट्‌सअ‍ॅप, स्नॅपचॅट आणि फेसबुकचा डेटाही हॅक केला जात होता, असे संशोधकांनी अधिक तपास केल्यानंतर उघड झाले आहे. गुगलला या स्पायवेअर संदर्भात माहिती मिळताच गुगलने आपल्या प्लेस्टोअरमधील सहा अ‍ॅप्स हटवले आहे. दरम्यान, 1 लाख युजर्सने हे अ‍ॅप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल केले होते. त्या युजर्सचा डेटा चोरी झाला आहे की नाही किंवा सुरक्षित आहे की नाही, यासंदर्भात गुगलने काहीही सांगितले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास

१५ दिवसांत चांदीच्या किमती ५७,००० रुपयांनी वाढल्या, या शहरांमध्ये पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे गेल्या

मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या विधानाला चोख उत्तर देत म्हटले की, विरोधक त्यांच्या पराभवासाठी सबबी शोधत आहेत

पुढील लेख
Show comments