Dharma Sangrah

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

Webdunia
बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:52 IST)
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता जीमेलमध्ये अनेक नवे फीचर्स पाहायला मिळणार आहेत.  जीमेलमध्ये आपोआप ईमेल डिलीट करणारं नवं फीचर येणार आहे. ठरावीक कालावधीनंतर ईमेल आपोआप डिलीट होईल असं हे फीचर असणार आहे. ईमेल कंपोज करताना युजर एका छोट्या ‘लॉक’ आयकॉनला क्लीक करुन पाठवत असलेल्या मेलची ‘एक्सपायरी डेट’ ठरवू शकतो.  ‘confidential mode’ असं या आयकॉनचं नाव आहे. म्हणजेच, ईमेल पाठवणारा व्यक्ती तो केव्हा डिलीट करायचा हे ठरवेल.
 

‘confidential mode’ नुसार ईमेल मिळालेला व्यक्ती मेलमधील कंटेंट कोणाशीही शेअर करु शकणार नाही. इतकंच नाही तर, कंटेंट कॉपी, डाउनलोड किंवा प्रिंट देखील करता येणार नाही. ईमेल केव्हा डिलीट करायचा याची वेळ मेल पाठवणारा (सेंडर) ठरवेल. मेल डिलीट करण्याची वेळ एक आठवडा, एक महिना किंवा काही वर्ष देखील असू शकते. याशिवाय नव्या मेलमध्ये पासवर्ड प्रोटेक्शनचं महत्त्वाचा पर्याय देखील दिला जाणार असल्याची माहिती आहे.  नव्या जीमेलमध्ये ई-मेल snooze करण्याचा पर्याय देखील असेल, तसंच कंपनी एक ऑफलाइन ईमेल स्टोरेजचा पर्याय देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले

Maharashtra kesari 2026 : पुण्यात महाराष्ट्र केसरी साठी 1500 मल्ल भिडणार

इराण-इस्रायल युद्धामुळे हापूस आंबा निर्यात धोक्यात, कोकणातील शेतकऱ्यांची चिंता

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जनहित याचिका दाखल

सोलापुरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या, पत्नीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments