Dharma Sangrah

धन्य ते गोकुळ, अन मथुरा झाले

Webdunia
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (21:12 IST)
होती अष्टमीची ती भयंकर काळरात्र,
यमुनेचं  पाणी  होतं पसरलं सर्वत्र,
पूर आला,पाण्यास  असें बहु जोर,
वादळाचे थैमान होते  रे घनघोर,
लीला तुझीच होती,हे ही  होतं ठावें,
कारागृहात तूच ,रात्रीस जन्मास यावे,
निसटल्या साखळ्या, उघडले दार,
प्रभू तुझी रे किमया  किती अपरंपार,
आलास जन्मा पोटी देवकीच्या,
छळा पासुनी रक्षिले सर्वा , भयंकर राक्षसांच्या!
धन्य ते गोकुळ, अन मथुरा झाले,
सावळे रूप मनोहारी तेथें जन्मा आले!
देउनी अर्जुना गीतेचे ज्ञान, सखोल,
जीवनामृत  च केलं तू मानवा बहाल,
जीवनाची दिशादर्शक गीता आहे,
आत्मसात करून, जीवन धन्य होत आहे!
......अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मकर संक्राती आणि एकादशी एकाच दिवशी ... काय करावे?

Ardhanari Nateshvara Stotram अर्धनारी नटेश्वर स्तोत्रम्

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments