Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (14:36 IST)
मुख्य लढत : चंद्रकांत खैरे (शिवसेना)विरुद्ध सुभाष झांबड (कॉंग्रेस) विरुद्ध इम्तियाज जलील  (वंचित बहुजन आघाडी)
 
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील हे उमेदवार आहेत.त्यामुळे यंदा औरंगाबादमधून यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील अशी लढत होणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

संबंधित माहिती

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

क्रिकेट सट्टेबाजीचे कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या, आरोपीला अटक

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

पाटण्यात बोटीचा अपघात, 17 बुडाले, कुटुंबातील चार जण बेपत्ता

TDP ला लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही तर भारत आघाडी त्यांना पाठिंबा देईल, संजय राऊतांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments