Marathi Biodata Maker

वडीलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट

Webdunia
बुधवार, 26 मे 2021 (16:13 IST)
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची आज ७६ वी जयंती आहे. वडीलांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखने जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही असे रितेशने म्हटले आहे. रितेश देशमुखचे त्याच्या वडीलांसोबत खुप चांगले घट्ट मैत्रीचेही नाते होते. बालपणीचा फोटो शेअर करत ती वेळ पुन्हा यावी अशी भावनाही रितेशने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या  जयंतीच्यानिमित्ताने रितेश देशमुख याने आपल्या वडीलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश देशमुख आपल्या वडिलांशेजारी बसला आहे. रितेशने सफेद रंगाचा शर्ट आणि पॅन्ट असा पेहराव केला आहे. हा फोटो शेअर करत रितेश देशमुख याने लिहिले आहे की, “तुमची आठवण आल्याशिवास एकही दिवस जात नाही. परंतु आठवण आल्यावर एक वेदना जाणवते ती कधीही जात नाही” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा! तुमची नेहमी आठवण येते अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर रितेश देशमुख यांने लिहिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पुणे : मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषारी दारूच्या सेवनाने झालेल्या मृत्यू प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले

भारतात प्लास्टिकच्या नोटा येणार

LIVE: गडचिरोलीत पोलिसांनी घनदाट जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी शस्त्रनिर्मिती केंद्राचा पर्दाफाश केला

GT vs RR : दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने

परदेशातून आलेल्या व्यावसायिकात इबोलाची लक्षणे आढळल्याने खळबळ; अहमदाबादमध्ये ४ जण क्वारंटाईन

पुढील लेख
Show comments