Dharma Sangrah

तरुणाईला वेड लावणाऱ्या 'पबजी गेम' वर बंदी

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (20:11 IST)
केंद्र सरकारने ११८ अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. याबाबतची बातमी पीटीआय या वृत्त संस्थेने दिली  आहे.
 
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. 
 
बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये ऍपलॉक, ऍपलॉक लाईट, ड्युअल स्पेस, क्लीनर, एचडी कॅमेरा सेल्फी, म्युझिक प्लेअर, ल्युडो ऑल स्टार प्ले, ब्युटी कॅमेरा प्लस या आणि अशा अणखी बऱ्याच ऍपचा समावेश आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ ऍपवर बंदी घालण्यात आली होती. ज्यामध्ये टीकटॉक, युसी ब्राऊजर, वेबो यांसारख्या ऍपचा समावेश होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात काही ठिकाणी भीषण उष्णता तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट

LIVE: हवामान विभागाने आज २३ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

Maharana Pratap Jayanti 2026 Wishes महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा

नागपूरमध्ये सावत्र मुलाने आपल्या आईवर लैंगिक अत्याचार केला, कौटुंबिक बदनामीमुळे पतीने गप्प राहायला सांगितले

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खान यांच्या अटकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात

पुढील लेख
Show comments