Festival Posters

आवाज न करणारा कॉम्प्युटर

Webdunia
कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरू होताना, बंद होताना तसेच वापरताना थोडाफार आवाज होतो. इस्रायलमधल्या कॉम्प्युटर बनवणार्‍या 'कॉम्प्यू लॅब' या कंपनीने लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारा सायलंट मिनी कॉम्प्युटर बाजारात आणला आहे. या कॉम्प्युटरचा अजिबात आवाज होणार नाही. मिंट बॉक्स मिनी-2 या सिस्टिममध्ये कोणताही पंखा बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यातून कोणताही आवाज येण्याचा प्रश्नच नाही. यात मेटल हाउसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कॉम्प्युटर लवकर थंड होतो. तसेच 0 ते 45 अंश सेल्सियस तापमानातही व्यवस्थित काम करतो. या कॉम्प्युटरचे वजन अवघे 250 ग्रॅम आहे. यात क्वाड कोअर इंटेल सॅलरोन जे 3455 प्रोसेसर लावण्यात आला आहे. यात चार जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात दोन यूएसबी पोर्ट आहेत. तसेच दोन मिनी डिस्प्ले पोर्टही देण्यात आले आहेत. या कॉम्प्युटरची किंमत 23,900 रूपये असेल. याचा आकारही खूप छोटा आहे. त्यामुळे तो खूप कमी जागा व्यापेल. कोणताही आवाज न करता सुरू होणे हे या कॉम्प्युटरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Vijay Hazare Trophy विजय हजारे ट्रॉफीत एका दिवसात 22 शतकं

BMC Elections काँग्रेसने यूबीटी-मनसे युतीपासून स्वतःला दूर केले; निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय

LIVE: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर शिंदे गटात सामील

बीएमसी निवडणुकीसाठी अभिनेता गोविंदा उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्टार प्रचारक बनले; शिवसेनेने ४० दिग्गजांची यादी जाहीर केली

पुढील लेख
Show comments