Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साताऱ्यात आघाडीचा उमेदवार ठरेना

Webdunia
गुरूवार, 7 मार्च 2024 (08:55 IST)
पक्षांच्या बैठकावर बैठका होत असून अजूनही अनेक मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागा वाटपाचा पेच कायम आहे. अशातच सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच लढणार असलीतरी शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा सातारा, माढ्यावर दावा केल्याने राजकीय तिढा वाढला आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि माढा हे लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ नेहमीच चर्चेत येतात. यावेळीही पेच निर्माण झालेला आहे. याला कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील फाटाफूट. या पार्श्वभूमीवरच आताची निवडणूक होत आहे. सातारा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाणार आहे. पण, या गटाचा उमेदवार ठरता ठरेना. त्यातच बुधवारी विशेष हेलिकॉप्टरने खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर मुंबईला गेले. तेथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. पण, चाचपणी आणि चर्चे व्यतीरिक्त काहीच झाले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार कधी ठरणार हे स्पष्ट नाही. मात्र, साताऱ्यात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्याला ३८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातून आघाडीने एकसंधपणा राखत वज्रमूठ तरी आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.
साताऱ्याची लढत उमेदवार कोण यावर ठरणार ?
 
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अजुनही कोणताही उमेदवार स्पष्ट नाही. खासदार श्रीनिवास पाटील हेच सध्यातरी प्रबळ ठरु शकतात. पण, त्यांचे वयोमान पाहता पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल. पण, तो ताकदीचा असावा लागणार आहे. तरच निवडणुकीत टीकाव धरता येईल. तर सातारा युतीत अजित पवार गटाकडे गेल्यास त्यांच्यापुढे अनेक पर्याय असलेतरी शरद पवार गटाचा उमेदवार कोण यावरच दादा गटाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर युतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने साताऱ्यावर दावा केला होता. पण, सध्यातरी या गटाकडून काहीच हालचाल नाही.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: अन्य 2 फरार मुख्य आरोपींना अटक, पोलिसांना मोठे यश

LIVE: बदलापुरात एकनाश शिंदे गट आणि भाजप गट एकमेकांसमोर आले

पुण्यात कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर दिसले

BMC निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौर पत्नीसह शिंदे गटात दाखल

धारावीतील लोक पुनर्विकास सुरू होण्याची वाट पाहत आहे, स्थानिक रहिवासी सर्वेक्षणाच्या समर्थनार्थ पुढे आले

पुढील लेख
Show comments