Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्रींनी नगरसेवकाला मारली थप्पड!

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (12:42 IST)
लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार हे आता एका नव्या वादात सापडले आहे. त्यांनी एका काँग्रेस नगरसेवकाला सर्वांसमोर कानशिलात लावली आहे. ज्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ भाजपने शेयर केला आहे. ज्यामध्ये सर्वांसमोर काँग्रेस नगरसेवकाला उपमुख्यमंत्री यांनी कानशिलात लावली आहे असे दिसले. आयात सर्व दूर शिवकुमार यांच्या या वागण्याची चर्चा सुरु झाली आहे. 
 
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांचा एक व्हिडीओ वायरल झाला असून त्यामध्ये यांनी काँग्रेस नगरसेवकाला थप्पड मारली आहे. भाजपने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे. डिके शिवकुमार त्यांच्या जवळ उभे असलेल्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला थप्पड मारतात. त्यानंतर उपमुख्यमंत्रींचे सुरक्षा पोलीस त्या व्यक्तीला मागे ढकलतात. 
 
भाजपने या पोस्टमध्ये लिहले आहे की, हे प्रकरण कर्नाटकच्या हावेरीतील  धारवाडच्या सावानूर परिसरातील आहे. इथे डिके शिवकुमार काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. यादरम्यान लोक घोषणा देत होते. डिके शिवकुमार जसे तिथे आले तर या नागरसेवकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. याचा राग आल्याने डिके शिवकुमार यांनी त्या नगरसेवकाच्या कानशिलात लावली. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. या यशाचे श्रेय प्रदेश काँग्रेस डिके शिवकुमार यांना मिळाले होते. ते आठवेळेस आमदार बनले आहेत. काँग्रेस त्यांना आपले संकटमोचक रूपात पाहते. या वेळच्या निवडणुकीत देखील कांग्रेसला जिंकले, ज्यामुळे कर्नाटक काँग्रेस मध्ये त्यांचे नाव मोठे झाले आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार, आज फडणवीस, शिंदे, पवार हेअमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात

ठाण्यामधील अंबरनाथच्या फार्मा कंपनीला भीषण आग

ठाणे रेल्वे स्टेशनवर महिलेने सुरक्षा रक्षकावर केला हल्ला

LIVE: सोमवार 25 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

पुढील लेख
Show comments