Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाटा एअरबस पाठोपाठ नागपुरात होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर

Webdunia
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (08:16 IST)
नागपूर – अगोदर टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला असतांना राज्यात संताप असतांना आता नागपूरमध्ये होणारा आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनचा विमान इंजन दुरुस्ती देखभालचा हा प्रकल्प होता. ही कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये हे युनिट टाकणार होती. या युनीटमध्ये वर्षाला २५० विमानांची इंजन दुरुस्ती व देखभालीची टार्गेट ठेवण्यात आले. त्यासाठी १ हजार ११५ कोटींची प्राथमिक गुंतवणुक ही कंपनी तयार करणार होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६०० जणांना रोजगार उपलब्ध झाला असता. पण, आता हा प्रकल्पही टाटा एअरबस पाठोपाठ हैद्राबादला गेला आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. हा प्रकल्प हैद्राबादला जाण्यामागे प्रशासकीय दिरंगाई असल्याचे बोलले जात आहे.
 
वेदांता – फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून गेल्यानंतर विरोधकांना सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता हा तिसरा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. टाटा समूहाचा एअरबस हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाणार आहे. त्यात सॅफ्रन कंपनीचा हा प्रकल्पही नागपूरात होणार होता. त्यामुळे गडकरी -फडणवीस असतांना हे दोन प्रकल्प नागपूरातून गेल्यामुळे त्यांना सुध्दा हा धक्का आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments